National Voters Day 2022: राष्ट्रीय मतदार दिवस , जाणून घ्या राष्ट्रीय मतदार दिवस माहिती

National Voters Day 2022: भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस (25 जानेवारी 1950) म्हणून देशभरात 2011 पासून 25 जानेवारी रोजी दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जात आहे. राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात नवीन मतदारांचा गौरव केला जातो आणि त्यांचे मतदार ओळखपत्र (ईपीआयसी) त्यांना वितरित केले जाते.


2011 पासून या दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून दरवर्षी 25 जानेवारीला हा दिवस साजरा केला जाऊ लागला. या दिवशी सहसा विविध राजकीय पक्ष आणि केंद्राकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. एक मतदार म्हणून देशातील नागरिकाला जेव्हा हा हक्क मिळतो, तेव्हा त्यासोबत ओघाओघानं काही महत्त्वाच्या गोष्टींचा फायदाही नागरिकांना होतो. पण, अनेकांनाच याबाबची माहितीही नसते.


राष्ट्रीय मतदार दिवस कसा साजरा केला जातो?


हा दिवस देशातील मतदारांना समर्पित आहे. देशासाठी योग्य नेता निवडण्यासाठी लोकांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शिक्षित आणि प्रोत्साहित केले जाते. राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात नवीन मतदारांचा सत्कार केला जातो आणि त्यांचे मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) सुपूर्द केले जाते.




राष्ट्रीय मतदार दिवसाचा इतिहास

25 जानेवारी हा भारतीय निवडणूक आयोगाचा (ECI) स्थापना दिवस आहे. तो १९५० साली अस्तित्वात आला. तरुण मतदारांना निवडणूक प्रक्रियेत भाग घेण्यासाठी आणि त्याचे उपयोग समजून घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी २०११ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. मतदानाचा हक्क आणि भारताच्या लोकशाहीचाही उत्सव साजरा करण्याचा हा दिवस आहे यात शंका नाही. निवडणूक आयोगाचे मुख्य उद्दिष्ट मतदारांची नोंदणी वाढवणे हा आहे, विशेषत: पात्रांची, ज्याला युनिव्हर्सल अॅडल्ट फ्रँचायझी असेही म्हणतात.




Post a Comment