Police seized liquor belonging to the husband of a Gram Panchayat member ग्राम पंचायत सदस्य च्या पतीची दारू पकडलीPolice seized liquor belonging to the husband of a Gram Panchayat member :  कर्जत तालुक्यातील अंबीजळगाव येथील सुरेश आबाजी यादव याची देशी व हातभट्टी ची दारू कर्जत पोलीसांनी पकडली आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबीजळगाव येथील हाॅटेल यादव पत्र्याच्या शेड मध्ये सुरेश यादव हे दारू विक्री करतात अशी खबर पोलीसांना मिळाली त्यानुसार कर्जत पोलीसांनी छापा टाकून सुरेश आबाजी यादव याला देशी व हातभट्टी दारू सह पकडले आहे.पोलीस काॅ गोवर्धन कदम यांच्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई गोवर्धन कदम, शाम जाधव यांनी केली आहे. 


सुरेश आबाजी यादव यांच्या पत्नी या अंबीजळगाव येथील ग्रामपंचायत च्या सदस्या आहेत. 

ग्रामपंचायत सदस्याच्या पतीलाच दारू विकताना पकडल्याने अंबीजळगाव गावात सर्वत्र चर्चा होत आहे.

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने