Rape of a minor girl: अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस जन्मठेप



Rape of a minor girl: अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,लैंगिक अत्याचार व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा प्रकरणी आरोपीस जन्मठेप व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायालय, श्रीगोंदा यांनी सुनावली आहे.

                   याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार. दिनांक ०६.८.२०२१रोजी एका विशिष्ट समाजातील अल्पवयीन मुलगी ही शेळ्या चारण्यासाठी रानात गेली असता तेथे आरोपी मोहन जयसिंग निंबाळकर वय-५५ (रा. पाटेवाडी ता. कर्जत) याने  सदर पिडीत  अल्पवयीन मुलीस पैशाचे आमिष दाखवून तिच्या शेळ्या  तो राहत असलेल्या भाडयाचे राहते घरासमोरल बाभळीची झाडास  बांधून तिला आपल्या राहत्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.सदर प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास तुझ्या आई बापाला मारून टाकून अशी धमकी दिली. सदर मुलीवर ६ ऑगस्ट पूर्वी  दहा ते बारा दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार केला होते. ६ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलीच्या बहिणीने ही घटना पाहून तिच्या आईला सांगितल्याने त्यानंतर पिडीत  मुलीची आई ही पिडीत मुलीस घेवुन  कर्जत पोलिस ठाण्यात  आली असता पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व महिला पोलीस नाईक जयश्री गायकवाड यांनी सदर घटनेबाबत  अल्पवयीन मुली कडे प्राथमिक चौकशी केली असता पीडित मुलीवर अत्याचार झालेल्या गुन्ह्याची उकल झाल्याने अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात  बलात्कार,बाल लैंगिक अत्याचार ,अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा  कलमान्वये अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव


        सदर गुन्ह्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमे असल्याने गुन्ह्याचा तपास  उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्याकडे वर्ग करण्यात आला अण्णासाहेब जाधव यांनी तपास हाती घेताच सदर गुन्ह्यातील आरोपी चा पोलीस स्टाफ मदतीने तात्काळ शोध घेऊन 24 तासाचे आत आरोपी तास गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडे गुन्ह्याचा सखोल तपास करून ६०दिवसात गुणात्मक दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालय श्रीगोंदा यांचे न्यायालयात दाखल करण्यात आले होते. 

अॅड सुमीत पाटील


              सदरचा खटला न्यायालयात जलद गतीने चालून सदर खटला दि. ३१ रोजी   जिल्हा सत्र न्यायाधीश श्री.शेख साहेब यांनी आरोपी नामे मोहन जयसिंग निंबाळकर वय 55वर्ष  राहणार पाटेवाडी तालुका कर्जत यास बलात्कार, बाललैंगिक अत्याचार तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमानुसार जन्मठेप व पाच हजार रुपये दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणात सरकारी अभियोक्ता म्हणून श्री.जी. के.मुसळे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अंमलदार एन. एस. दरेकर यांनी उत्तमरित्या काम पाहिले. 



निशुल्क अॅड सुमीत के पाटील याचे काम


 कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील अॅड सुमीत के पाटील यांनी 

मूळ फिर्यादी तर्फे कामकाज पाहिले.हे कामकाज निशुल्क पणे केले व सहाय्यक

सरकारी वकील अे. डी. ढगे, व्ही के भोर्डे व जी के मुसळे यांनी या केस मध्ये कामकाज करून पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून दिला.  

 पोलीस अंमलदार संतोष धांडे ,संतोष साबळे यांनी तपासकामी उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना मदतनीस म्हणून कामकाज पाहिले आहे .

       सदरचे खटल्यात अवघ्या पाच महिन्याच्या आत अटक आरोपीस जन्मठेपेची शिक्षा झालेले आहे.

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने