कर्जत / प्रतिनिधी : सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत नरहरी महाराज पायी दिंडी सोहळा या विश्वस्त संस्थेच्या अध्यक्ष पदी कर्जत येथील प्रसिद्ध व्यापारी सचिन कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. 

    श्री संत नरहरी महाराज पायी दिंडी सोहळा या विश्वस्त संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा कर्जत येथील नरहरी सोनार याच्या मंदिरात पार पडली त्यावेळी हि निवड करण्यात आली. 

नरहरी सोनार पायी दिंडी सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. 

 नेवासा ते पंढरपूर अशी पायी दिंडी वारी श्री संत नरहरी महाराज सोनार या विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून पायी दिंडी सोहळा पार पडला जातो तर सोनार समाजात या संस्थेचे अन्य साधारण महत्त्व आहे. या मानाच्या संस्थेच्या अध्यक्ष पदी कर्जत येथील सचिन कुलथे यांची निवड करण्यात आल्याने महाराष्ट्र राज्यात कर्जत करांचा एकप्रकारे बहुमान मिळाला आहे. 

 पायी दिंडी सोहळा साठी राज्यातील सोनार समाज तन मन व धन मदत करत असतात. 

या संस्थेच्या इतर कार्यकारिणी पुढील प्रमाणे

उपाध्यक्ष दिलीप उदावंत , रमेश फापाळे, 

सचिव बाळासाहेब दहिवाळ, 

खजिनदार आत्माराम उदावंत, प्रदिप डाहळे,

तर हि निवड जेष्ठ अरूण मजरतकर याच्या अध्यक्ष ते खाली झालेल्या सर्व साधारण सभेत करण्यात आली. 

या वेळी माजी अध्यक्ष रघुनाथ सोनांबेकर, सुरेश कुलथे, देवराम शहाणे, नरहरी सोनार देवस्थान चे अध्यक्ष अनिल कुलथे, अनिल आप्पा कुलथे, सुभाष माळवे, भरत वेदपाठक आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment