Rahul Bajaj Passes away: बजाज समूहाची धुरा तब्बल ४० वर्षे यशस्वीरित्या वाहणारे ज्येष्ठ उद्योगपती व बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचं आज पुण्यात निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते.राहुल बजाज ,यांना भावपूर्ण श्रद्धांजली मेसेजेस पुढील प्रमाणे .
उद्योजक, सामान्य माणसाचा रोजचा प्रवास येणे जाणे सुलभ करणाऱ्या दुचाकीचे निर्माते, उत्पादन क्षेत्रात पुण्याचे नाव अग्रेसर करणारे, बजाज ग्रुपचे #राहुल_बजाज यांना भावपूर्ण श्रद्धांजली! #RahulBajaj
उद्योजक असून पण सत्तेच्या विरोधात उघडपणे भूमिका घेणारा एक उत्तम माणूस म्हणजे राहुल बजाज.
भावपूर्ण श्रद्धांजली
ॲटोमोबाईल क्षेत्रातील त्यांचे योगदान अनमोल आहे. ते सामाजिक क्षेत्रातही कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे सामाजिक भान असणारे द्रष्टे उद्योजक काळाच्या पडद्याआड गेले.भावपूर्ण श्रद्धांजली
बजाज ऑटो समूहाचे दिशादर्शक,ज्येष्ठ उद्योजक पद्मभूषण #राहुल_बजाज यांना भावपूर्ण श्रद्धांजली.उद्योग विश्वात त्यांनी स्व:कर्तृत्वाने मिळवलेलं स्थान सर्वांनाच प्रेरणा देत राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,हीच प्रार्थना !
बजाज ग्रुपचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योगपती
पद्मभूषण श्री. राहुल बजाज यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या निधनामुळे भारतीय उद्योगसमूहात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राहुल बजाज यांनी उद्योग तथा सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य आजच्या तरुण उद्योजकांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे.
बुलंद भारत की,बुलंद तस्वीर,हमारा बजाज
ज्येष्ठ उद्योगपती,पद्मभूषण राहुल बजाज यांचें दुःखद निधन. बजाज समूहाचं नेतृत्व करणाऱ्या राहुल बजाज यांनी हमारा बजाज ही टॅगलाईन खऱ्या अर्थाने वास्तवात उतरवली. यांच्या जाण्यामुळे उद्योग जगतातील तारा आपण गमावला आहे. भावपुर्ण श्रद्धांजली.
तब्बल पाच दशकं बजाज ऑटो समूहाचं नेतृत्व करणारे ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या निधनाने भारतीय उद्योग जगताचे अपरिमित नुकसान झाले आहे.
Post a Comment