Ahmednagar: अंघोळ करीत असताना मुलीचे वीडियो काढून केले ब्लॅकमेल 8 वी तील मुलीवर अत्याचार प्रकरणात आरोपीस आरोपीस जन्मठेप .
Ahmednagar: पिडीतेचे अंघोळ करीत असताना त्याचे मोबाईलमध्ये काढलेली व्हिडीओ शुटिंग पिडीतेस दाखवुन मी सांगेल त्या प्रमाणे करायचे नाही तर तुझी व्हिडीओ शुटींग सगळीकडे पाठविल अशी धमकी दिली त्यानंतर दोन दिवसांनी फिर्यादीची आई मजुरीचे कामावर गेल्यानंतर दुपारी ०१.०० वा चे सुमारास आरोपी रामदास मोरे याने पिडीतेस त्याचे घरामध्ये बोलावुन पिडीतेवर बळजबरीने अत्याचार केले आहेत. तसेच या व्हिडिओ चा वापर करून सतत अत्याचार केले आहेत.
सदर मुलगी ही १४ वर्षची असुन जिल्हा परीषद प्राथमिक शाळा हिरडगाव येथे ०८ वी इयत्ता मध्ये शिक्षण घेत होती. पिडीतेचे राहते घरापासुन थोड्या अंतरावर आरोपी नामे रामदास रोहीदास मोरे रा हिरडगाव ता श्रीगोंदा हा त्याचे पत्नी मुलाबाळासह रहावयास असुन गुन्हा दाखल होणेपूर्वी काही दिवसापूर्वी पिडीत फिर्यादीची आई मजुरीचे कामासाठी गेली असतांना दुपारी १२.०० वा चे सुमारास आरोपी रामदास रोहीदास मोरे याने पिडीतेच्या राहते घरी बोलावले आणि अत्याचार केले.
त्यामुळे फिर्यादीस दिवस गेले होते. सदर पिडीतेच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुरंन २०५४/२०२० भा.द.वि कलम ३७६ (२)(i)(j).(n).३५४(c) बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ३.४.७.८ प्रमाणे दिनांक १३.१२.२०२० रोजी बाजुम नमुद कलमान्वये गुन्हा दाखल आला होता.
सदर गुन्हयाचा सखोल तपास करून उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी करून आरोपी रामदास रोहीदास मोरे वय ३५ वर्ष रा हिरडगाव ता श्रीगोदा जि अहमदनगर याचे विरुद्ध मा जिल्हा सत्र न्यायालय श्रीगोंदा येथे गुणात्मक दोषरोपत्र सादर केले होते. सदर गुन्हयात आरोपीस जन्मठेप तसेच ५०००/- रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महीने साथी कैद तसेच भादवि कलम ५०६ अन्वये एक वर्षाची सश्रम कारावसाची शिक्षा तसेच २०००/- रुपये दंड, दंड न भरल्यास एक महीन्या साधी कैद अशी शिक्षा ठेठावण्यात आली आहे. सदर च्या दोन्ही शिक्षा आरोपीन एकाच वेळी भोगायच्या आहेत. तसेच पिडीतेला नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा असे नमुद करण्यात आले आहे.
सदरचा महत्वपूर्ण निकाल श्रीगोंदा येथील मा अतिरीक्त सत्र न्यायधीश श्री एम एस शेख यांनी दिला आहे सरकारच्या वतीने श्रीमती कापसे यांनी कामकाज पाहीले आहे.