Ahmednagar :कर्जत येथे मकतब ए आलमगीर जलसा ए आम (सांस्कृतीक कार्यक्रम ) अनेक विद्यार्थ्यांनी केले कलागुणांचे सादरीकरण
कर्जत ( Ahmedngar) मकतब ए आलमगीर (Maktab e Alamgir) कर्जतमधील विद्यार्थ्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि अरबी भाषेवरील प्रभुत्व पाहून समाधान वाटले. त्यांनी लहान वयात या सर्व भाषेचे आकलन करीत त्यास सांस्कृतिक कार्यक्रमात प्रसार करून त्यांची शिक्षणातील गोडी यानिम्मिताने दाखवली ती कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन जमियत उलेमा मौलाना इर्शादुल्लाह कासमी यांनी केले. ते कर्जत येथे मकतब ए आलमगीर जलसा ए आम (सांस्कृतीक कार्यक्रमात) बोलत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, मौलाना युसूफ, मौलाना तय्यब आदी उपस्थित होते. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची सादरीकरण करीत उपस्थितांची वाहवा मिळवली.
या मुस्लीम देशात शेकडो वर्षे जुने हिंदू मंदिर इथे जळतेआहे दुर्गेची अखंड ज्योत
यावेळी पुढे बोलताना मौलाना इर्शाद-दुल्लाह कासमी म्हणाले की, सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण घेण्याचा अधिकार सरकारने दिला आहे. या अधिकारानुसार प्रत्येकाने शिक्षण घेत आपल्या क्षेत्रात प्रगती साधावी. जेणेकरून त्याचा लाभ देशाच्या प्रगतीला होत राहील. अभ्यासक्रमातील प्रत्येक विषय स्वतासह देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. त्यात विशेष प्राविण्य घेत आपल्यातील हुन्नर समाजासमोर आणणे ते खरे शिक्षण आहे असे म्हणत शेवटी विश्वशांतीसाठी दुवा केली.
सकाळी दूध पिण्याचे आचर्यकारक फायदे – Benefits of drinking milk
यावेळी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांची कलागुण पाहून मनाला समाधान वाटले. त्याचे भाषेवरील पकड आणि सादर करण्याची उत्तम पद्धत त्यांच्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे प्रमानपत्र सिद्ध करते. याच शैक्षणिक गुणवत्तेने त्यांचे भविष्य उज्वल असून देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे असे म्हणत विद्यार्थ्याना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्याचे कलागुण पाहून पालक देखील त्यांच्या शैक्षणिक गुणांना प्रोत्साहन देत होते.