ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

आत्माराम बाबा मांदळी , आत्माराम बाबा मांदळी कर यांच्या विषयी माहिती !

Atmaram Baba: कर्जत तालुक्यातील मांदळी या ठिकाणाची माहिती आपण पाहणार आहोत . मांदळी गावात  उत्तरेला हा मठ आहे.  लालगीर बुवांच्या समाधी मंदीराच्या सभामंडपाजवळ जाऊन पोहचतो. समोरच्या बाजूला आपल्याला त्यांची संजीवन समाधी दिसते. तिथे आत फक्त बालब्रह्मचारी असणाऱ्या व्यक्तीला प्रवेश दिला जातो. याच संजीवन समाधीसमोर लालगीर बुवांच्या १८ शिष्यांच्या समाधीचे दर्शन आपल्याला होते. तर उजव्या बाजूला गणपती व मारुतीचे मंदीर दिसते. तिथून या समाधीच्या समोरुन चालत गेल्यावर सभामंडपाच्या आग्नेय दिशेस आत्मारामगीरी महाराज यांची जीवंत वास्तव्य असलेली खोली आहे.

 

कोण आहेत ,आत्मारामगीरी महाराज !

आत्मारामगीरी महाराज (atmaram maharaj mandali) गेल्या अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी एकाच शारीरिक अवस्थेत खडतर तपश्चर्या करत आहेत. त्याच्याच शेजारी आत्मारामगीरी बाबा (atmaram baba) यांचे जुने निवासस्थान असून पाठीमागील प्रांगणात एकादशी व विशेष उत्सवाच्या वेळी होणाऱ्या कीर्तनासाठी हॉल आहे. स्वामींचा आशीर्वाद मिळाला की सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रध्दा आहे.

 

संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन साधु महान तपस्वी सद्गुरु लालगीर स्वामींनी संजीवन समाधी १३ व्या शतकात मांदळी ता.कर्जत जि.अहमदनगर या ठिकाणी घेतलेली आहे. तसेच या ठिकाणी महान तपस्वी ॐ चैतन्य आत्मारामगिरी महाराज यांचे जीवंत वास्तव्य ३२ वर्षांपासून आहे.

 

सद्गुरु लालगीर स्वामीं हे योगी संन्याशी गिरी पंथातील साधू होते. त्यांनी या परिसरात बरीच वर्षे तपश्चर्या केल्याचे सांगण्यात येते व त्यानंतर त्यांनी मांदळी येथेच समाधी घेतली.प्रत्येक एकादशीला भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात.आषाढी एकादशीला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते.या काळात भक्तांसाठी अन्नदानाची सोय असते तसेच विशेष कीर्तनसेवाही या दिवशी पार पडते विजयादशमी – या दिवशी होमाचा मोठा कार्यक्रम होतो व महाप्रसाद म्हणून भोपळ्याची भाजी केली जाते. तदनंतर स्वामींची पालखी ग्रामदर्शनासाठी निघते व सर्वांना भोपळा भाकरी देऊन उत्सवाची सांगता होते. याचबरोबर दत्तजयंती, महाशिवरात्री, आषाढी दिंडी सोहळा हे उत्सव देखील मोठ्या आनंदात भाविक भक्त साजरे करतात.

(कर्जत- जामखेड )

Leave A Reply

Your email address will not be published.

ITECH Marathi । Short poem on my india my pride Ashadhi Ekadashi 2022 अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !