MahaYuva App: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , यांनी लॉन्च केलं ,‘महायुवा ॲप’ जाणून फायदे !
MahaYuva App: शासकीय योजना, रोजगार संधी आणि पदवीधर तरुण यांच्यादरम्यान दुवा ठरू शकेल अशा ‘महायुवा’ ॲपचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विधान भवन समिती सभागृहात अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री ॲड. अनिल परब, आमदार विलास पोतनीस तसेच सूरज चव्हाण, मिलिंद साटम आदी उपस्थित होते.
MahaYuva App फायदे
या ॲपवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीत माहिती असेल. पदवीधर या ॲपवर आपले प्रोफाईल तयार करतील. त्यांच्याकडील विशेष प्राविण्य व आवडीचे क्षेत्र याबद्दलची माहिती अपलोड करेल. या आधारे त्याला उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली जाईल.
शासकीय योजना, रोजगार संधी आणि पदवीधर तरुण यांच्यादरम्यान दुवा ठरू शकेल अशा #महायुवाॲप चे मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांच्या हस्ते विधान भवन समिती सभागृहात अनावरण करण्यात आले. या ॲपवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीत माहिती असेल. पदवीधरांना या ॲपवर आपले प्रोफाईल तयार करता येईल#MahaYuvaApp pic.twitter.com/w6jyji0xjj
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 25, 2022