ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

China Plane Crash: भयानक घटना , दक्षिण चीनमध्ये133 प्रवासी असलेले विमान कोसळले

China Plane Crash: चीनमधून मोठी बातमी येत आहे. चीनमध्ये बोईंग ७३७ प्रवासी विमान क्रॅश झाले असून त्यात १३३ जण होते. हे विमान कुनमिंगहून ग्वांगझूला जात होते. घटनेची अधिक माहिती येणे बाकी आहे.

प्रांतीय आपत्कालीन व्यवस्थापन ब्युरोचा हवाला देऊन बोईंग 737 विमान वुझौ शहर, गुआंग्शी प्रदेशाजवळील ग्रामीण भागात क्रॅश झाले आणि “डोंगराला आग लागली”, असे सीसीटीव्हीने म्हटले आहे.

घटनास्थळी बचाव पथके रवाना करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सीसीटीव्हीने सांगितले की, “चायना इस्टर्न एअरलाइन्सचे बोइंग 737 विमान 133 जणांना घेऊन जाणाऱ्या टेंग काउंटी, वुझोउ, गुआंग्शी येथे क्रॅश झाले आणि डोंगराला आग लागली.”

Leave A Reply

Your email address will not be published.