Female aeronautical: देशात १५ टक्के महिला वैमानिक, हि आहे महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला वैमानिक
Female aeronautical: देशातल्या एकूण वैमानिकांपैकी १५ टक्के महिला असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक (Civil aviation) मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी दिली. हवाई वाहतूक क्षेत्रात महिलांची कामगिरी या विषयावर फिक्की या उद्योजक संघटनेतर्फे आज दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या क्षेत्रात असंख्य अडचणींवर मात करीत महिलांनी आपला ठसा उमटवला आहे असं ते म्हणाले.
वैमानिक माहिती मराठी
विमान चालकाला वैमानिक (aeronautical) असे म्हणतात. वैमानिक हा विमानाचा कप्तान असतो. प्रवाशांचा हवाई प्रवास सुखाचा व सुरक्षित व्हावा हे वैमानिकाचे प्रथम कर्तव्य असते. धोक्याची परिस्थिती उद्भवल्यावर ती हाताळणे हे वैमानिकाच्या कौशल्यावर अवलंबून असते. हे असे नैपुण्य त्याला प्रशिक्षणातून आणि अनुभवातून मिळवावे लागते. लढाऊ वैमानिकांना वेगळे प्रशिक्षण दिलेले असते. भारतीय हवाई दलातील महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला वैमानिक भूपाली वडके ही आहे.
पायलट (वैमानिक) होण्यासाठी काय करावे ?
वैमानिक होण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता १२ वी आहे. त्यांनंतर कोणत्याही उपलब्ध संस्थेतून शिक्षण घेउन मग त्या देशांतील परीक्षा देउन वैमानिक बनतां येतं.
वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था
- इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण अॅकॅडमी
- द बॉम्बे फ्लाईंग क्लब
- Aeronautical Training Institute, Lucknow Admission process
एरोनॉटिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश JEECUP प्रवेश परीक्षेच्या आधारे केला जातो. याचा अर्थ या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला JEECUP परीक्षेसाठी पात्र होणे आवश्यक आहे.