ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Maurya Empire: मौर्य काळात शेतकरी कराच्या व सरकारला पिके देत होते का ?

Maurya Empire: मौर्य साम्राज्याच्या आधिपत्याखाली एकछत्री शासन होते . यामुळे अंतर्गत लढायांना आळ बसला होता  व प्रथमच संपूर्ण भारताची अशी एकत्र आर्थिक व्यवस्था उदयास आली होती .

Maurya Empire
Maurya Empire

मौर्य काळात शेतकरी कराच्या व सरकारला पिके देत होते का ?

आधीच्या काळात शेकडो राज्ये, शेकडो लहान सैन्ये, शेकडो प्रमुख तसेच आपापसातील अनेक युद्धे अशी परिस्थिती होती. मौर्य काळात शेतकरी कराच्या व सरकारला पिके देण्याच्या बोज्यातून मुक्त झाले. त्याऐवजी अर्थशास्त्र या चाणक्याच्या ग्रंथातील तत्त्वांच्या आधारे शासनाद्वारे प्रशासित अशा शिस्तशीर व उचित प्रणालीद्वारे कर घेतला .

 

चंद्रगुप्ताने संपूर्ण भारतभर एकच चलन स्थापित केले होते . त्याने भारतात शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना न्याय व सुरक्षा मिळावी म्हणून प्रांतीय नियंत्रकांचे व प्रशासकांचे जाळे निर्माण केले. मौर्य सैन्याने अनेक गुन्हेगारी टोळ्या, प्रांतीय खाजगी सैन्यांना पराभूत केले. फुटकळ जमीनदारांची राज्ये साम्राज्यात विलीन केली. मौर्य शासन कर गोळा करण्यात कडक असले तरी त्याचा खर्च अनेक सार्वजनिक कार्यांवर केला गेला. याच काळात भारतात अनेक कालवे तयार केले गेले. भारतात अंतर्गत व्यापार या काळात नवीन राजकीय एकात्मता व अंतर्गत सुरक्षा यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाढला.

 

मौर्य साम्राज्याने आंतरराष्ट्रीय व्यापारासही प्रोत्साहन दिले. ग्रीक क्षत्रपांच्या राज्यांशी मैत्री करून त्यांच्याशी व्यापाराचे आंतरराष्ट्रीय जाळेही वाढविले. सध्या पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या सीमेवरील खैबर खिंड ही या व्यापारात अतिशय महत्त्वाची होती. पश्चिम आशियातील ग्रीक राज्ये भारताशी मोठ्या प्रमाणावर व्यापार करू लागली.

मौर्य साम्राज्याचे मलय द्वीपकल्पाबरोबरही व्यापारी संबंध होते. भारत रेशीम, रेशमी कापड, कपडे तसेच मसाले व विविध खाद्यपदार्थ निर्यात करी. युरोपाबरोबर विज्ञान व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण केल्याने हे साम्राज्य अधिकच समृद्ध झाले. अशोकाच्या कारकीर्दीत हजारो रस्ते, कालवे, जलमार्ग, दवाखाने, धर्मशाळा व इतर सार्वजनिक कामे झाली. धान्य व कर गोळा करण्यासंबंधीच्या अनेक कठोर कायद्यांच्या शिथिलीकरणाने मौर्य साम्राज्यात उत्पादनक्षमता व आर्थिक हालचाल वाढली.

1 Comment
 1. First of all I want to say great blog! I had a quick question that I’d like to ask if you do not mind.

  I was curious to find out how you center yourself and clear your thoughts before writing.
  I’ve had difficulty clearing my thoughts in getting my
  thoughts out there. I truly do take pleasure in writing
  however it just seems like the first 10 to 15 minutes are lost simply just trying
  to figure out how to begin. Any recommendations or hints?
  Appreciate it!

Leave A Reply

Your email address will not be published.

आयुष्यात कधीच कोणावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू नका आजचा सुविचार अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील ! Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !
अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi
अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi