International law: इराणकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग, जाणून घ्या आंतरराष्ट्रीय कायदा नेमका काय आहे ?
International law: उत्तर इराकमधल्या अमेरिकी दूतावासा (US Embassy) जवळ झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी इराणनं घेतली आहे. नागरी रहिवासी क्षेत्रावरचा हा हल्ला पूर्णपणे असमर्थनीय असल्याचं सांगत अमेरिकेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.अमेरिकन अध्यक्षांचे सुरक्षासल्लागार (Security Adviser to US President)जेक सुलिवान यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. इराणकडून अशी भीती असलेल्या इतर पश्चिम आशियाई देशांनाही अमेरिका पाठिंबा देईल असं त्यांनी म्हटलं आहे. इराणने आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग केला असून त्याचा जबाब द्यावा अशी मागणी इराकने केली आहे.
आंतरराष्ट्रीय कायद्याच्या संदर्भात ठराव कोण करतो ?
आंतरराष्ट्रीय कायद्याची निर्मिती विधिमंडळात होत नाही. राष्ट्रांना न्यायदान करण्यास न्यायालये असत नाहीत. आणि असली तरी त्यांच्या मागे दमनकारी यंत्रणा असत नाही. राष्ट्रे सार्वभौम असल्यामुळे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ अधिकार कोणाचाच (न्यायालयाचासुद्धा) असत नाही; त्यामुळे ऑस्टिनसारखे लेखक आंतरराष्ट्रीय कायद्यास ‘कायदा’ म्हणत नाहीत. ते त्याला नीतिबल असणारे नियमच समजतात. ओपेनहाइम वगैरेंचे मत वेगळे आहे. त्यांच्या मताप्रमाणे आंतरराष्ट्रीय कायदा राष्ट्राराष्ट्रांमधील असून त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ नसला, तरी त्या कायद्याच्या वैध स्वरूपाला अडथळा येत नाही. ते म्हणतात की तो कायदा म्हणजे फक्त नीतिनियम नव्हेत. तो जरी विधिमंडळात तयार झाला नसला, तरी त्याची उगमस्थाने अनेक आहेत. त्यांच्या मते राष्ट्रे त्याचे वैध स्वरूप नाकारत नाहीत, उलट ते मान्य करून आपले वागणे त्या कायद्यांविरुद्ध नाही, असे म्हणतात. या कायद्यांमागे लोकमत, सुरक्षामंडळाची कारवाई आणि युद्धाची भीती यांची अनुशास्ती असते.
आंतरराष्ट्रीय कायद्याचे जनक
डच तत्त्ववेत्ता ह्यूगो ग्रोशिअस (Dutch philosopher Hugo Grosius) याने सतराव्या शतकामध्ये या नियमांना आधुनिक आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्वरूप दिले. हेच आंतरराष्ट्रीय कायद्याचे जनक आहेत .