ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Karjat News: कर्जत पोलीस स्टेशन ,प्रांताधिकारी कार्यालय .एकात्मिक बाल विकास कार्यालय सर्व शासकीय कार्यालयात रंगपंचमी साजरी

karjat news live : कर्जत येथे रंगपंचमी निमित्त लहान मुलांनी सिल्व्हरचा मोठ्या प्रमाणात वापर करत रंग उधळण करत करून रंगपंचमी साजरी केली तर कर्जत तालुका पत्रकार संघाने सर्व शासकीय कार्यालयात जाऊन रंगपंचमीचा आनंद लुटला.


कर्जत बस स्थानक येथे बनवलेल्या पत्रकार कट्यावर स्वच्छता अभियान राबवल्यानंतर सुरू झालेल्या रंगपंचमीत संपादक असलेले नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल यांना रंग लावन्यात आले यावेळी नगरसेवक अभय बोरा व अमृत काळदाते यांना रंग लावत पत्रकारांनी एकमेकाना रंग लावला, यावेळी स्वच्छता करण्यासाठी आलेल्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या नंतर बातमी साठी विविध कार्यालयात आपण जातोच आज रंग लावायला जाऊ असे म्हणत सर्व पत्रकारांंनी रंगपंचमी आनंद लुटला.

कर्जत पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहा पोलीस निरीक्षक सतिष गावित, उप निरीक्षक अमरजित मोरे आदी सह पोलीस कर्मचारी, तहसील कार्यालयात तहसीलदार नानासाहेब आगळे, नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे, नायब तहसीलदार प्रकाश बुरंगुळे, सहा निबंधक अधिकारी तनपुरे सह सर्व कर्मचारी, पंचायत समिती कार्यालयात गट विकास अधिकारी अमोल जाधव, पंचायत समिती कृषी अधिकारी मुकुंद पाटील, विस्तार अधिकारी राजा अटकोरे, सह कर्मचारी, प्रांताधिकारी कार्यालयात शीरस्तेदार मच्छिंंद्र पाडळे सह कर्मचारी, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, एकात्मिक बाल विकास कार्यालय त प्रकल्प अधिकारी प्रशांत मिटकरी व कर्मचारी, तालुका कृषी आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड, यासह नगर पंचायत कार्यालय मधील कर्मचारी अशा विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना रंग लावून पत्रकारांनी रंगपंचमी साजरी केली .

यामध्ये गणेश जेवरे, आशिष बोरा, सुभाष माळवे, मुन्ना पठाण, मोतीराम शिंदे, डॉ अफरोज पठाण, यांनी सहभाग घेतला. होते पत्रकारांच्या या आगळ्या वेगळ्या प्रेमळ रंगाने अधिकारी ही खुश झाले व सर्वानीच पत्रकारांना ही शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi
अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi