Mahijalgaon:मराठी साहित्य प्रतिष्ठान चे माहीजळगाव येथे बहारदार कविसंमेलन संपन्न


Mahijalgaon: मराठी भाषा गौरवदिन व कवी कुसुमाग्रज जयंती निमित्ताने कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे कर्जत तालुका मराठी साहित्य प्रतिष्ठान चे वतीने नुकतेच भावगीत गायन व निमंत्रितांचे  कविसंमेलन डॉ.

राजेश तोरडमल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.भैरवनाथ मंदिरात रात्री सहा ते नऊ या तीन तासांच्या काव्यमैफलित डॉ संजय राऊत, डॉ.जतीन काजळे ( जामखेड), 

डॉ विजय चव्हाण, रमेश आमले, संतोष  लगड,किसन आटोळे ( कर्जत ) , नागेश शेलार, हरिष हातवटे, कवयित्री संगीता होळकर ( आष्टी)  आदी मान्यवर कवींनी

सहभाग घेतला. डॉ राऊत यांची सुरेल आवाजातील भावगीते व

संगीता होळकर व नागेश शेलार यांच्या कवितांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मराठी भाषेचा हा

माहीजळगाव येथे पहिलाच कार्यक्रम असूनही  गावातील बहुतांश  ग्रामस्थांनी  कवितांचा

तन्मयतेने तीन तास आस्वाद घेतला. कवी आ.य.पवार लिखित

सीनाकाठच्या कविता व करकुंजाचा थवा ही दोन पुस्तके  अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांना भेट देण्यात आली.मराठी साहित्य प्रतिष्ठान शाखा कर्जत तालुकाचे अध्यक्ष डॉ शिवाजी शिंदे यांनी

उपस्थित कवींना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.प्रास्ताविक कवी किसन आटोळे यांनी केले. तर उपसरपंच दीपक गायकवाड, डॉ.रंधवे, किशोर कोपनर, अशोक

घोडके, डॉ रावदादा शिंदे आदी मान्यवरांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ राऊत यांनी आभार मानले.

बहारदार कविसंमेलनाचे सूत्रसंचाल

नागेश शेलार यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजनासाठी कर्जत तालुका मराठी साहित्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ शिवाजी शिंदे सचिव कवी किसन आटोळे

यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment