राष्ट्रीय जल पुरस्कार २०२२
National Water Award 2022: जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सुर्डी ग्राम पंचायत सोलापूर, दापोली नगरपंचायत रत्नागिरी, ग्रामविकास संस्था, औरंगाबाद या गैरसरकारी संस्थेला आणि दै. ॲग्रोवनला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय जल पुरस्कारा’नं आज सन्मानित करण्यात आलं.
नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनं तिसऱ्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कारांचं आयोजन करण्यात आलं होतं. देशात सुरू असलेल्या जल संरक्षण कार्यक्रमात समाजाच्या सर्व घटकांनी सक्रिय सहभाग घेतला, तर भारत पुन्हा एकदा ‘सुजलाम सुफलाम’ होईल, असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं. भारतीय संस्कृतीत पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या जीवनदायी नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.