ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Pimpri Chinchwad: कार चालकाला कडून पीएमपी चालकाला मारहाण राष्ट्रवादी कामगार युनियन कडुन कारवाई करण्याची मागणी करत दिला काम बंद आंदोलनाचा इशारा

 Pimpri Chinchwad: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्यावतीने पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व लगतच्या ग्रामीण भागात प्रवासी सेवा पुरविण्यात येते. आजमितीस प्रचंड वाहतुक कोंडीमध्ये बस चालविताना चालकांना खूप कसरत करावी लागत आहे. सर्व चालक प्रमाणिकपणे आपले काम बजावित असताना त्यांना नाहक प्रवाशांकडून त्रास सहन करावा लागत असतो. अशा परिस्थितीमध्ये सुध्दा आमचे चालक चांगली प्रवासी सेवा बजावित आहेत. एम. एल.

 Pimpri Chinchwad
Pimpri Chinchwad

दिनांक २४/०३/२०२२ रोजी चालक श्री शरद लक्ष्मण तांदळे हे बस के सीएनजी ५९७ वर कार्यरत असताना पिंपरी गावातील बस स्टॉप जवळ कार क एमएच ०३ एएम-६२९३ ची व बसची घासाघीस झाली. त्यामुळे कार चालकाने श्री तांदळे यांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केले, त्यामुळे त्यास उपचाराकरीता वायसीएम हॉस्पिटल येथे अॅडमिट करावे लागले आहे. या घटनेमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळातील कामगारांमध्ये भितींचे यातवरण पसरलेले आहे व त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होत आहे.

पीएमपी चालकाला झालेल्या मारहाणी संदर्भात पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अवताडे साहेब यांची आज युनियनच्या पदाधिकारी यांनी भेट घेऊन सविस्तरपणे चर्चा करुन निवेदन देण्यात आले तसेच सदर घटनेतील कार चालकाला लवकरात लवकर अटक करुन कडक शासन करावे अन्यथा काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या वतीने देण्यात आला
यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मा.अवताडे साहेब यांनी तपास योग्य दिशेने चालू असुन लवकरच आरोपीला अटक केली जाईल असे आश्वासीत केले आहे.

यावेळी राष्ट्रवादी युनियनचे सहकार्याध्यक्ष मा. नगरसेवक श्री.प्रसाद भाई शेट्टी कामगार नेते सुनिल भाऊ नलावडे,हरिश ओव्हाळ,संतोष शिंदे,प्रफुल्ल शिंदे,अविनाश घोगरे,दिपक गायकवाड,इ युनियनचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते,कामगार बंधु मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi
अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi