ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ ,दरमहिन्याला मिळणार मोफत धान्य !

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) ला आणखी सहा महीने म्हणजेच, सप्टेंबर 2022 पर्यंत (सहावा टप्पा) मुदतवाढ केंद्र सरकारनं दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळानं या मुदतवाढीला मंजुरी दिली. आता कोविडची लाट नियंत्रणात येत असली, आणि देशभरात सर्व आर्थिक व्यवहारांनाही गती मिळाली असली, तरीही आर्थिक व्यवस्था सुरळीत होण्याच्या काळात, एकही गरीब कुटुंब उपाशी राहू नये यासाठी, हा निर्णय घेतला आहे.

या सहा महिन्यात, प्रत्येक लाभार्थ्याला त्याच्यासाठीच्या रेशनच्या धान्याव्यतिरिक्त दरमहा माणशी आणखी पाच किलो धान्य दिलं जाणार आहे. म्हणजेच प्रत्येक कुटुंबाला, त्यांच्या नेहमीच्या धान्याच्या दुप्पट धान्य मिळणार आहे. या योजनेचा पाचवा टप्पा या महिनाअखेरीला संपणार आहे.

काय आहे ,प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना एप्रिल 2020 पासून सुरु झालेली ही जगातली सर्वात मोठी अन्नसुरक्षा योजना आहे. सरकारनं आतापर्यंत या योजनेवर 2 लाख 60 हजार कोटी रुपये निधी खर्च केला असून, पुढच्या सहा महिन्यांसाठी, आणखी 80 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत, 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत धान्यवाटप केलं जाणार आहे.

मे आणि जून या दोन महिन्यांसाठी गरजुंना मोफत धान्य मिळणार

धानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मे आणि जून या दोन महिन्यांसाठी गरजुंना मोफत धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे .या योजनेंतर्गत प्रती व्यक्ती पाच किलो धान्य देण्यात येईल. जवळपास 80 कोटी लाभार्थ्यांना याचा लाभ मिळेल, असं केंद्र सरकारनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

कोरोना उद्रेकाच्या काळात गेल्या वर्षी देखील केंद्र सरकारनं गरजूंना मोफत धान्याचं वाटप केलं होतं. यंदाही कोरोनाचा उद्रेक झाला आहे, अशा वेळी गरिबांना आवश्यक उष्मांक मिळणं गरजेचं आहे, यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे, त्यासाठी 26 हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.

1 Comment
  1. What’s up, its fastidious post regarding media print, we all understand media is a
    enormous source of information.

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi
अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi