ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

ram navami 2022 date: राम नवमी कधी आहे ,का साजरी करतात राम नवमी जाणून घ्या इतिहास आणि माहिती !

Ram Navami 2022 :चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे.. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात.

 

राम नवमी कधी आहे (ram navami 2022 date)

यावर्षी राम नवमी हि रविवार दिनांक १० एप्रिल रोजी साजरी होत आहे . अनेक ठिकाणी रामजन्मोस्तव हा ८ दिवस साजरा करतात .

 

राम नवमी साजरी कशी करायची ?

राम नवमी दिवशी (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो.श्री रामांच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात.श्री रामांची पूजा करताना त्यानां करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात.. तसेच श्री रामांना हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात.. श्रीरामांना केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात.. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो.

राम नवमी 2022 चे महत्व

प्रभू रामाने चौदा वर्षांचा वनवास केला आणि या काळात रावणाचा वध करून धर्माची स्थापना केली. असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि समृद्धी येते. अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. हे देखील एक कारण आहे की यावेळी भगवान रामाची भक्ती विशेष दर्जाची असेल.

श्रीरामनवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन,पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात. श्रीराम हे सर्व आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात.

1 Comment
  1. AshHirty says
Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi
अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi