ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Tourist places in Nashik: नाशिक मधील पाहण्यासारखी पर्यटन स्थळे, नक्की पहाच !

Nashik: आपण नाशिक मधील पर्यटन स्थळांची (Tourist places in Nashik) माहिती पाहणार आहोत .नाशिक मधील हि पर्यटन स्थळे आपण नक्कीच पहावीत जाणून घेऊयात !

 

 

 

 

काळाराम मंदीर

काळाराम मंदीर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले. प्रभु रामचंद्र आपल्या वनवासा दरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदीर होते,असे मानले जाते.सदर मंदीराचे बांधकामासाठी 2000 कारागिर 12 वर्ष राबत होते.पश्चिम भारतातील प्रभु रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक असे हे मंदीर आहे.245 फुट लांब व 145 फुट रुंद मंदिर परिसराला 17 फुट उच दगडाची भिंत आहे.मंदिरासाठी सर्व बाजुंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे.मंदिरात प्रभू रामचंद्र, सिता, लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील 2 फुट उंचीच्या मुर्त्या आहेत.चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो.

Happy April Fool’s Day 2022 Messages: ‘एप्रिल फुल डे’च्या निमित्ताने खास मराठमोळे संदेश आणि जोक्स

खंडोबा मंदीर

हे मंदिर देवळाली छावणी परिसरात लहान टेकडीवर वसलेले आहे.भगवान शंकराचे अवतार मानले जाणारे श्री खंडोबा महाराजांचे हे मंदिर 500 वर्ष जुने आहे.पौराणिक कथेनुसार मल्ल दैत्य व मणी दैत्य या दोन राक्षस बंधुशी मंदिर संबधित आहे. या दोन्ही दैत्यांनी भगवान शिवाची आराधना करुन त्यांना भुतलावर कोणीही मारु शकणार नाही, असा वर प्राप्त करुन घेतला वर प्राप्ती नंतर संत, ऋषी व निरपराध लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली.भगवान शिवाने श्री खंडोबाचा अवतार घेऊन या दोनही दैत्यांचा वध केल्यानंतर भगवान शिव या टेकडीवर विश्रामासाठी आले, म्हणुन या मंदीरास ‘विश्रामगड’ असे देखील म्हटले जाते. या टेकडीला ‘खंडोबाची टेकडी ’असे देखील म्हणतात.

कावनई-कपिलधारा तिर्थ

हे तिर्थक्षेत्र इगतपुरी तालुक्यात असुन नाशिक शहरापासुन 50 कि.मी. अंतरावर स्थित आहे. इगतपुरी पासुन कावनाईचे अंतर 12 कि.मी. आहे.

श्री संत गजानन महाराज यांनी या परिसरात तपश्चर्या केली असे मानले जाते. हे ठिकाण कावनाई किल्ल्याच्या पायथ्याशी असुन सभोवतालचा परिसर नयनरम्य आहे. कपिलधारा तिर्थ येथे विविध मंदीरे असुन जवळच माता कामाक्षी मंदीर देखील आहे. या ठिकाणी वर्षभर वाहणारा नैसर्गिक पाण्याचा झरा देखील आहे.

कुशावर्त तिर्थ

कुशावर्त तिर्थ हे त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यभागी श्री त्र्यंबकेवर ज्योतिर्लिंग मंदिरा पासुन अदमासे 300 मी.अंतरावर स्थित आहे. कुशावर्त तिर्थ हे 21 फुट खोलीचे नैसर्गिक पाण्याचे झरे असलेले कुंड सन 1750 मध्ये बांधण्यात आले.गोदावरी नदी ब्रम्हगिरी पर्वतावरुन लुप्त झाल्यांनतर हया ठिकाणी प्रकट होते अशी काही लोकांची श्रध्दा आहे. या कुशावर्तात आधी स्नान करुन मग त्र्यंबकेश्चर मंदिरात दर्शनार्थ जाण्याची परंपरा भाविक पाळतात. कुशावर्तात खाली जिवंत पाण्याचे झरे आहेत व गोदावरीच्या उगमस्थानापासुन नंतरच्या नदीप्रवाह कुशावर्तात ये‌ऊन पुढे वळण घेतो.

North Korea: उत्तर कोरिया हल्ल्याचे अधिक मजबूत मार्ग आणि साधनं विकसित करणार आहे .

मांगी तुगी मंदीर

मांगी तुगी मंदीर नाशिक पासुन 125 कि.मि. अंतरावर सटाणा तालुक्यात आहे.समुद्रसपाटीपासुन 4343 फुट उंचीवर मांगी शिखर तर समुद्र सपाटीपासून 4366 उंचीवर तुंगी शिखर आहे.  मांगी तुंगी हे प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे. मांगी तुंगीच्या पायथ्याशी ‘’भिलवाडी’’ हे गांव आहे. येथे साधना केल्याणे मोक्ष प्राप्ती मिळते असे मानले जाते.

मांगी

मांगी शिखराची उंची जास्त नसली तरी येथे सराईत गिर्यारोहकच चढु शकतात. शिखराच्या पायथ्याशी भगवान महावीर, अदिनाथ, पार्श्वनाथ, हनुमान, वाली, सुग्रीव इ. यांच्या 356 कोरीव मुर्ती आहेत. गुफांमध्ये देखील काही कोरीव काम आढळते. या ठिकाणी “ मांगीगिरी मंदीर ‘’ आहे.

तुंगी

तुंगी शिखर मांगी शिखरापेक्षा उंच आहे. या शिखराला देखील तुंगी शिखरासारखीच प्रदक्षिणा करता येते. प्रदक्षिणा मार्गावर तीन गुंफा आहे. त्या पैकी एका गुंफेत “ तुंगीगिरी मंदीर ‘’ असून. भगवान बुध्दांच्या 99 कोरीव मुर्ती येथे आहेत.

चांभारलेणे

“चांभारलेणे” हा 11 व्या शतकातील जैन मंदीरांचा समुह आहे. नाशिक शहराच्या बाहय भागात रामशेज किल्ल्याजवळ एका टेकडीवर ही मंदीरे स्थित आहे.

धर्मचक्र प्रभाव तिर्थ विल्होळी

हे स्थळ नाशिक शहरापासुन 12 कि.मि. अंतरावर मुंबईच्या दिशेने राष्ट्रीय महामार्ग क्र.3 वर विल्होळी गाव येथे स्थित आहे.

पवित्र त्रिलोकनाथ मंदिर तीन मजली आहे. मंदीरा बाहेर सिध्दाचल ,अबु, गिरणार व सामेतशिखर यांच्या प्रतिकृती आहेत. तळमजल्यावर भगवान महावीरांची 12 फुट उंचीची मुर्ती आहे.मुर्तीच्या भोवती चार मुलनायक आहेत. मंदीरातील भगवान पाश्वर्नाथांची मुर्ती अतिशय देखणी असुन अष्टपथ महातिर्थ यांची देखील मुर्ती मंदीरात स्थापित आहे.

तपोवन

तपोवन म्हणजे ‘’तपस्वी लोकांचे वन’’ हे ठिकाण नाशिक येथे पंचवटी पासुन 1.5 कि.मी.अंतरावर खालच्या बाजुस गोदावरी नदी तिरी आहे.

तपोवन हे एकेकाळी दंडकारण्याचा भाग होता.रामायण या महाकाव्याशी हया निसर्गरम्य ठिकाणाचा संबध असुन वनवासा दरम्यान प्रभु राम,लक्ष्मण,सिता या ठिकाणची फळे ग्रहण करत होते.या ठिकाणीच रावणाची बहिण शुर्पणखेचे लक्ष्मणाने नाक कापले, यामुळे ‘’नाशिक’’ हे नाव पडले असे देखील म्हटले जाते.या पवित्र परिसरात रामपर्णकुटी,लक्ष्मीनारायण मंदिर,जनार्दनस्वामी मंदीर,अशी मंदिरे आहेत.सिंहस्थ कुंभमेळया दरम्यान हया ठिकाणी साधुंचे वास्तव्य असते..

पंचवटी

नाशिक शहरात पंचवटी परीसर हा गोदावरी नदीच्या डाव्यातीरावर आहे. काळाराम मंदीरा जवळ वटवृक्षांचा समुह असुन हा समुह पाच वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने या परिसरास ‘ पंचवटी ’ असे म्हटले जाते. ‘पंच’ म्हणजे पाच व ‘वटी’ म्हणजे वडाचे झाड असा अर्थ होतो.

पांडव लेणी

नाशिकच्या पांडव लेणीही प्रसिध्द आहेत. नाशिक नवीन बसस्थानकापासुन ५ व महामार्ग बसस्थानकापासुन ४ कि.मी. अंतरावर एका मोठ्या टेकडीवर या लेण्या आहेत. ही लेणी मात्र प्राचीन आहेत. सुमारे २५०० वर्षापूर्वींची. येथे जो पाली भाषेतील शिलालेख आहे त्यावरुन ही लेणी २००० वर्षांपूर्वीचीच असल्याचे निश्चित समजले जाते. एकूण २४ लेणी आहेत.

श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर

श्री त्रयंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर नाशिक पासुन 28 कि.मी.अंतरावर स्थित आहे.गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्रयंबकेश्वर वसलेले आहे.

सध्याचे मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव ( सन 1740 ते 1760 ) यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले आहे.त्रयंबकेश्वर मंदिराचे व्यवस्थापन हे त्रयंबकेश्वर मंदिर हे ट्रस्टकडुन केले जाते. ट्रस्टकडुन भक्तांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

 

रामकुंड

रामकुंड हे नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात असून मध्यवर्ती बसस्थानकापासून दोन कि.मी. अंतरावर आहे.

वनवासादरम्यान या ठिकाणी प्रभुराम स्नान करीत होते अशी मान्यता असल्याने यास पवित्र समजले जाते. या कुंडा जवळच ‘’अस्थिविलय तीर्थ ‘’ आहे. रामकुंडाचे बांधकाम सातारा जिल्हयातील खटावचे जमिनदार श्री. चित्रराव खटाव यांनी 1696 मध्ये केले. श्री श्रीमंत माधवराव पेशवे (चौथे पेशवे) यांच्या मातोश्री श्रीमती गोपिकाबाई यांनी नंतरच्या काळात रामकुंडाची दुरुस्ती केली.भाविक आपल्या मृत नातेवाइकांच्या अस्थि, अस्थिविलयकुंडात विसर्जित करतात.महात्मा गांधी,पंडीत नेहरु,इंदिरा गांधी,यशवंतराव चव्हाण यांचेसह अनेक महान नेत्यांच्या अस्थि रामकुंड येथे विसर्जित करण्यात आल्या आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

ITECH Marathi । Short poem on my india my pride Ashadhi Ekadashi 2022 अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !