जास्त वेळ झोपल्याने स्मरणशक्तीवर होता वाईट परिणाम !
यापूर्वीच्या अनेक अभ्यासांमध्ये, अल्झायमरचा आजार झोपेच्या कमतरतेशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे, परंतु एका नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की दीर्घकाळ डोळे बंद राहणे किंवा जास्त झोपेचा स्मरणशक्तीवर वाईट परिणाम होतो.
संशोधनादरम्यान, शास्त्रज्ञांना असे आढळून आले की जे लोक नऊ तास किंवा त्याहून अधिक वेळ झोपतात त्यांची स्मरणशक्ती आणि भाषा कौशल्यांमध्ये लक्षणीय घट होते. यासोबतच जे लोक सहा तासांची झोप घेतात त्यांच्यामध्येही धोका दिसून आला.
संशोधनानंतर, शास्त्रज्ञांनी दावा केला की सात किंवा आठ तास झोप घेणे सर्वोत्तम आहे आणि हे धोके टाळता येऊ शकतात. जरी संशोधकांना पूर्ण खात्री नव्हती की जास्त झोपेमुळे नैराश्याचा धोका वाढू शकतो, परंतु त्यांनी असे म्हटले की जर एखाद्या व्यक्तीला मेंदूचा त्रास किंवा आजार असेल तर त्याला जास्त झोप लागते.
यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ मियामी मिलर स्कूलच्या टीमने सुमारे ५,२४७ स्पॅनियार्ड्सचा सात वर्षे अभ्यास केला. सहभागी झालेले स्पर्धक 45 ते 75 वयोगटातील होते आणि ते विविध समाजाचे होते. यामध्ये शिकागो, मियामी, सेनडियागो, न्यूयॉर्क येथील लॅटिनोचा समावेश होता.
या अभ्यासादरम्यान, संशोधकांनी सहभागींचे लक्ष, स्मरणशक्ती, भाषा तसेच मेंदूचे आरोग्य आणि त्यातील बदलांचे निरीक्षण केले.
शास्त्रज्ञांच्या मते, जास्त झोपेमुळे मेंदूमध्ये डाग पडतात, ज्याला व्हाईट मॅटर हायपरटेन्सिटी असेही म्हणतात. या जखमांमुळे मेंदूतील रक्तप्रवाहावरही परिणाम होतो. MRI वर दिसणारे हे पांढरे डाग नैराश्य आणि पक्षाघाताचा धोका वाढवतात.
मियामी विद्यापीठातील न्यूरोलॉजिस्ट आणि झोपेचे तज्ज्ञ डॉ रामोस यांनी सांगितले की, हायपोसोम्निया आणि जास्त झोपेचा थेट संबंध एखाद्या व्यक्तीच्या न्यूरोलॉजिकल आजाराशी असतो, जो अल्झायमर आणि नैराश्यासाठी जबाबदार असतो.