ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Ahmednagar:सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते विशेष मोहिमेतील लाभार्थ्यांना लाभ मंजुरी वाटप

आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून लाभार्थ्यांना विशेष मोहिमेतून लाभ

Karjat / Jamkhed
Karjat / Jamkhed

Karjat / Jamkhed:आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून तसेच कर्जत व जामखेड तहसील कार्यालय आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या विशेष सहकार्यातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विशेष मोहीमेतील लाभार्थ्यांना लाभ मंजुरी आदेश वाटप कार्यक्रम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते कर्जत येथील समर्थ विद्यालय तर जामखेडमधील राज लॉन्स येथे पार पडला.

 

ज्यामध्ये कर्जत व जामखेड अशा दोन्ही तालुक्यातील 5 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ मंजुरी आदेशाचे वाटप करण्यात आले. या मोहिमेतुन समाजातील प्रत्येक घटकाला सहाय्य करण्यासाठी शासनाने आखलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ अनुदान योजना या सर्व योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देवून आतापर्यंत रोहितदादा आमदार झाल्यापासून मतदारसंघातील 7 हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेतला आहे.

कर्जत तालुक्यातील विकास कामांची पत्रकारांपासून लपवून पाहणी ,स्थानिक अधिकाऱ्यांनी माहिती दिलीच नाही !

रोहित पवार आमदार होण्यापूर्वी मागील दहा वर्षात जेवढ्या लाभार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून विविध योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक लाभार्थ्यांना रोहितदादा आमदार झाल्यापासून गेल्या दोन वर्षात या योजनेचा लाभ मिळाला आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विशेष मोहिमेतील लाभार्थ्यांना लाभ मंजुरी आदेशाचे वाटप केल्यानंतर आता जामखेड तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना एकत्रित एकूण 15 लाख 91 हजार रुपये तर कर्जत तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना एकत्रित 30 लाख 80 हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्य शासनाच्यावतीने केले जाणार आहे.

Karjat : युवक क्रांती दल, कर्जत तालुका यांच्या वतीने दादा पाटील महाविद्यालयात ‘कार्यकर्ता संवाद’ कार्यक्रम

त्याचबरोबर महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या मिशन वात्सल्य योजनेचीही प्रभावी अंमलबजावणी कर्जत जामखेड तालुक्यात आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून करण्यात आली. या योजनेत आतापर्यंत कर्जतचे 606 तर जामखेडचे 1100 लाभार्थी पात्र ठरले आहेत. हा आकडा सोमवारी नोंदणी झाल्यामुळे आणखी वाढणार आहे. नगर जिल्ह्यात वात्सल्य व बालसंगोपनमध्ये कर्जत व जामखेड तालुका लाभार्थ्यांच्याबाबतीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोनाकाळात आपले पती गमावलेल्या महिलांना व पालकांचे छत्र हरवलेल्या आणि संरक्षणाची गरज असलेल्या निराधार मुलांना वात्सल्य व बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य केले जाते.

सरकारी योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत आणि व्यक्तीपर्यंत कसा पोहोचेल यासाठी अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही कायमच प्रयत्न करत असतो आणि यापुढेही प्रयत्न करत राहणार – आमदार रोहित पवार

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !