ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Ahmednagar: नगर सोलापुर महामार्ग वर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी


Ahmednagar: कर्जत तालुक्यातील नगर सोलापूर या महामार्गावरील कोकण गांव येथील बोरूडेवस्ती जवळ चार वाहनांचा रात्री नऊ वाजता भीषण अपघात झाला .

या अपघातात दुचाकीवरील कृष्णा मल्हारी बोरुडे ( वय २५ , रा . कोकणगाव , ता . कर्जत ) व क्रुझरमधील सोपान दिनकर काळे या दोघांचा मृत्यू झाला . तर , अन्य वीस जण गंभीर जखमी झाले आहेत . एकाचा जागीच , तर दुसऱ्याचा उपचारासाठी नगरला घेऊन जाताना मृत्यू झाला . जखमींमध्ये काही महिलांचाही समावेश आहे . सोलापूरकडे नगरहून जाणाऱ्या मालट्रकने ( टी . एन . ८८ एक्स ९ २४३ ) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने गाडी चालवित कर्जत तालुक्यातील कोकणगावजवळ असणाऱ्या बोरुडेवस्ती परिसरात नगरहून सोलापूरकडे जात असलेल्या अपेरिक्षाला ( डी . एम . ४५५७ ) मागून जोरदार धडक दिली . या धडकेने ॲपेरिक्षा रस्त्याच्या कडेला खाली गेल्याने उलटली . यानंतर अपेरिक्षाच्या पुढे दुचाकी होती . त्यालाही ट्रकने मागून जोरात धडक दिली . अपघातात ट्रक ने दुचाकीला काही अंतरपर्यंत फरफटत नेले . दुचाकीस्वार कृष्णा मल्हारी बोरुडे हा ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला . दरम्यान , त्याच वेळी सोलापूरहून नगरकडे जाताना क्रुझरला ( एम . एच . ९ बी . एम . ९ ८५ ९ ) समोरून धडक दिली . या क्रुझरमधील सोपान दिनकर काळे यांचा अपघातात उपचारासाठीनगरला घेऊन जाताना मृत्यू झाला . अपघाताची घटना समजताच नागरिक व पोलिस कर्मचारी, १०८ चे तीन पथक घटनास्थळी धावले . अपघातातील जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेमधून नगरला उपचारासाठी पाठविण्यात आले .


देवदर्शन आटोपून माघारी निघाली क्रुझर क्रुझरमधील सर्वजण पंढरपुरातून देवदर्शन घेऊन श्रीरामपूरकडे जाताना हा अपघात झाला . यामागे एक दुचाकीही होती . हा दुचाकीस्वार मांदळी येथील यात्रेसाठी जात होता . यावेळी ट्रकने त्यालाही जोराची धडक दिली . यानंतर त्याने मालवाहतूक अॅपेरिक्षाला धडक दिली . विशेष म्हणजे या अपघातात दोन वर्षांच्या लहान मुलीला कसलीही दुखापत झाली नाही .


ट्रक चालकाची चूक


अपघाताला जबाबदार असणाऱ्या मालट्रक चालकाने चार वाहनांना जोराची धडक दिली . यामध्ये दोघांना आपले प्राण गमवावे लागले , तर काही जण गंभीर जखमी झाले . हे सर्व जखमी आरडाओरडा करत होते . अशा परिस्थितीतही ट्रक चालकाने गाडी न थांबता सरळ पळ काढला . यानंतर पोलिसांनी ट्रक पकडला . मात्र , चालक पळून गेला होता.

१०८ चे योगदान

अहमदनगर जिल्हा येथील कार्य तत्पर १०८च्या कांचन बिडवे व डॉ सुवर्णामाला गोखले
यांना अपघाताची माहिती समजताच त्यांनी कर्जत, मिरजगाव व रूईछतीसी येथील १०८ रुग्णवाहिका तातडीने अपघातस्थळी पाठविल्या व २० जखमींना सिव्हिल हॉस्पिटल नगर येथे भरती केले. या रूगवाहिका सोबत डॉ उदय बलदोटा, डॉ विनायक दारूंडे, डॉ निखिल गायकवाड, शरद अस्वल, जालीदंर राऊत, सागर वाळके यांनी अपघातातील रूग्णांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली.


नगर- सोलापूर रस्ता रुंदीकरणाचे काम जोमाने चालू असून , यामुळे रस्त्यावर एकेरी वातूक सुरू आहे . त्यामुळे रस्ता वाहतुकीस अरुंद पडत आहे . त्यामुळे या रस्त्यावर सारखे अपघात होत आहेत . रस्त्याचे काम चालू असताना जागोजागी दर्शक फलक लावणे गरजे आहे

1 Comment
  1. […] नगर सोलापुर महामार्ग वर भीषण अपघात, दो… […]

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !