Beed: ट्रॅक्टर खाली चेंगरून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू,या गावातील घटना !
Beed: अतिशय धक्कादायक अशी घटना धारूर बस डेपोच्या समोर आज सकाळी घडली आहे केज वरून माजलगावला (Majalgaon) जाणाऱ्या ट्रॅक्टर खाली येऊन आठ वर्षीय बालकाचा चेंगरून जागीच मृत्यू झाला . या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.
धारूर येथील बस डेपोच्या समोर केजवरून माजलगावकडे जाणारे ट्रॅक्टर एम एच 44 डी. 1908 च्या खाली चेंगरून शिवराज सुरवसे या बालकाचा जागीच मृत्यू झाला. सुरवसे यांचे बस डेपोच्या बाजूला जनावरांचा गोठा आहे. शिवराज आणि आजी गोठ्यात दूध काढण्यासाठी सकाळी जात होते .दूध घेऊन येताना केजवरून माजलगावला जाणारा ट्रॅक्टर च्या खाली शिवराज आल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय.