ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

मृत्युंजय ग्रुप आणि अखंड हिंदू समाज कर्जत यांच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव साजरा

 


मृत्युंजय ग्रुप आणि अखंड हिंदू समाज कर्जत तालुका यांच्यावतीने आयोजित रामनवमी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तमाम हिंदू बांधवासह मुस्लिम समाजाने देखील उपस्थित राहत सामजिक ऐक्याचे दर्शन घडवले. मुस्लिम समाजातील प्रतिनिधीनी देखील प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी बोलताना तहसीलदार नानासाहेब आगळे म्हणाले की, कर्जतमध्ये सर्व सण-सोहळे उत्सव एकत्रित साजरे करीत जातीय सलोख्याचे दर्शन घडवत आहे. मुळात सर्वांनी एकत्र येत विचारांची देवाणघेवाण करावी. संवाद साधला जावा हाच मूळ उद्देश आहे ह्या धार्मिक सणाचा असून त्याची प्रचिती कर्जत येथे येत आहे. यासह पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. राष्ट्रीय महापुरुष, महामानव आणि देवदेवतांना ठराविक समाजानी वाटून न घेता त्याला सर्वसमावेशक व्यापक स्वरूप देत कुठलेही गालबोट न लागता सण आणि उत्सव साजरे करावेत. तसेच समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. यावेळी इल्लूभाई पठाण, युवक काँग्रेसचे सचिन घुले यांनी शुभेच्छा दिल्या. शेवटी मृत्युंजय समूहाचे संस्थापक अध्यक्ष दीपक शहाणे यांनी आभार मानले. यावेळी नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, सकल मराठा समाज कर्जतचे प्रमुख समन्वयक धनंजय लाढाणे, महावीर बोरा,
सचिन कुलथे, राजेंद्र गुंड, सचिन सोनमाळी, शब्बीरभाई पठाण, शरीफ पठाण, खाजाभाई बागवान, स्वप्नील देसाई, गणेश क्षीरसागर, महेंद्र धांडे, सुदाम धांडे, प्रफुल्ल नेवसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. संध्याकाळी उशिरा भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात आली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !