पुणे महानगर परिवहन महामंडळातील सेवकांची फसवणूक , सातवा वेतन आयोग लागु करण्याचे फक्त तोंडी आश्वासन
Pimpri chinchwad: पुणे महानगर परिवहन महामंडळातील (Pune Metropolitan Transport Corporation) सेवकांना सातवा वेतन आयोग फरकासहित लागु करणेकामी मा.संचालक मंडळाने ठराव कमांक १९ दिनांक २५/०२/२०२१ रोजी मंजूर केलेला आहे. त्याप्रमाणे पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांच्या हिश्याप्रमाणे संचलन तुट पोटीच रक्कम संस्थेकडे वर्ग केलेली आहे.
प्रशासनाने सातवा वेतन आयोग एप्रिल पेड इन मे २०२२ च्या वेतनात लागु करण्याचे तोंडी आश्वासन दिलेले आहे. परंतु आजपर्यंतचा अनुभव पाहता प्रशासनाने सर्व कामगार संघटनांना सातवा वेतन आयोग लागू करणेबाबत तोंडी आश्वासन देवून पूर्तता न केल्याने सर्व कामगार संघटनांची फसवणूक केलेली आहे. तसेच कामगारांच्या खालील प्रश्नांबाबत सर्व संघटनांसमवेत बैठक आयोजित करून कोणताही निर्णय न घेता चुकिची माहिती देवून दिशाभुल केलेली आहे.
PMPML खाजगी बस ठेकेदार संपावर, प्रवाशांचा खोळंबा
कामगारांचे प्रश्न
- सर्व संवर्गातील कामगारांच्या पदोन्नती बाबत.
- सर्व संवर्गातील रोजंदारी पदावरील सेवकानां कलिम करणे बाबत.
- ई. तिकिट मशिन मधील त्रुटी बाबत.
- चालक सेवकांना वाहक पदा करीता आवश्यक असणारे लायसन काढण्यास सक्ती करणे.
तरी कामगारांच्या प्रश्नां संदर्भात प्रशासनाने बस डे पूर्वी दोन दिवस अगोदर लेखी भुमिका जाहिर करावी. जेणे करून सर्व कामगारांना बस डे व वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आनंदाने सहभागी होता येईल. अन्यथा पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. कामगार कृती समितीला बस डे व वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा किंवा कसे याबाबत विचार करावा असे आवाहन कर्मचाऱ्यांनकडून महामंडळास करण्यात आले आहे .
Pimpri Chinchwad: पीएमपीएमएल मधील कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी घेराव आंदोलन !