Scholarship News :भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, अर्ज भरण्यास सुरवात ,
Scholarship News: भारत सरकारने विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप (शासकीय शिष्यवृत्ती) मिळविण्याची संधी दिली आहे. यासाठी दहावी, बारावी, पदवीधर किंवा पदव्युत्तर अभ्यास करणाऱ्या अशा सर्वांना याचा लाभ घेता येणार आहे. वय १६ ते ४० वर्षांच्या आतील प्रत्येक विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकतो
अनुसूचित जाती , इतर मागासवर्गीय , विमुक्त जाती भटक्या जाती व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क योजनेंतर्गत २०२१-२२ वर्षासाठी mahadbtmahait.gov.in वर ३० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई जिल्हा समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी केले.
शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे 2022
- रहिवासी दाखला
- उत्पन्न दाखला
- एसएससी प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- वैधता प्रमाणपत्र
- बँक खाते क्रमांक
- आधार क्रमांक