रोहित पवारांच्या भेटीने आजी भावुक !
कर्जत जामखेड(Karjat Jamkhed) चे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) कर्जत दौऱ्यावर असताना अनेक लोकांची विद्यार्थ्यांची आपुलकीने चौकशी करत असतात . कर्जत तालुक्यात दौरा करत असताना तालुक्यातील बर्गेवाडी (Bargewadi) मध्ये एका आजींची रोहित पवारांनी आपुलकीने चौकशी केली . मोठ्या प्रमाणात ऊन असल्यामुळे आजीने रोहित पवारांना सावली ला बसण्याची विनंती देखील केली .यातून रोहित पवारांचा आपलेपणा दिसून आला . यानंतर रोहित पवार आपल्या कार्यक्रमांसाठी पुढे गेले .रोहित पवारांनी केलेल्या चौकशी मुळे खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया आजीने दिली .
असेच एका युवा कार्यकत्यानं रोहित पवारांना आपल्या गाडी वर बसवून आपल्या हॉटेल मध्ये नेल्याच देखील पवारांनी ट्विटर वर पोस्ट केले होते . या घटनेमुळे खूप आनंद झाला असल्याची माहिती पवारांनी दिली होती .
आमदार रोहित पवार सामाजिक तसेच विविध लोककल्याणकारी कामे करतच असतात, याचबरोबर सामाजिक बांधिलकी देखील जपत असतात . रोहित पवार आपल्या सोशल मीडिया खात्यावर सक्रिय असतात. ते नेहमीच असे विविध व्यावसायिक ,शेतकरी , सुरक्षा रक्षक असा लोकांना भेटत असतात त्यांच्या बरोबर फोटो काढत असतात आणि सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती पोस्ट करत असतात.