Gunratan Sadavarte : कोण आहेत ,गुणरत्न सदावर्ते , जाणून घ्या !
Gunratan Sadavarte: सध्या महाराष्ट्रात होत असलेल्या राजकारणात गुणरत्न सदावर्ते हे चर्चित आहेत . गुणरत्न सदावर्ते हे नेमके कोण आहेत तसेच गुणरत्न सदावर्ते यांच्या फॅमिली विषयी माहिती आपण पाहणार आहोत . महाराष्ट्र शासनाने २०१८ साली मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) प्रवगातंर्गत आरक्षण दिले होते. मात्र मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात यशस्वीपणे लढवली होती आणि आता ST संपाचा प्रकरणामुळे ते चर्चित आहेत .
ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे मुळचे नांदेडचे आहेत. त्यांचे शिक्षण औरंगाबाद आणि मुंबईत झाले आहे . ते विविध चळवळींत आधीपासूनच सक्रिय होते. नांदेडला ते ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ही त्यांची संघटना देखील ते चालवायचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळायचे.
गुणरत्न सदावर्ते यांच्या कुटुंबाविषयी माहिती
गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी ॲड. डॉ. जयश्री पाटील या आहेत . हे दोघे पती पत्नी आणि त्याची मुलगी झेन असे त्याचे छोटेसे कुटुंब आहे . राष्ट्रपतींच्या हस्ते झेन सदावर्तेला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे .