International Labour Day 2022: का साजरा करतात ,आंतरराष्ट्रीय कामगार दिन ,जाणून घ्या !
I

nternational Labour Day 2022: १ मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ (International Labour Day) दिवस म्हणून ओळखला जातो. जगभरातील अनेक देशांमध्ये ही सार्वजनिक सुट्टी असते .कामगार आणि कामगार वर्गाच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आठवण म्हणून हा दिवस पाळला जातो.
हा दिवस अनेक देशांमध्ये राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्यात आला आहे. याला भारतात अंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस किंवा कामगार दिन असेही म्हणतात.
कामगार दिनाचा इतिहास
१९ व्या शतकाच्या मध्यावर कामगार चळवळीतून कामगार दिन सुरू झाला. ज्याची मुख्य मागणी ‘आठ तासाच्या कामाच्या दिवसाची’ होती. या संदर्भातील पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून आली तेव्हापासून हा दिवस तेथे सुट्टी म्हणून जाहीर झाला. ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातील अराजाकातावादी संघटनांनी १ मे १८८६ रोजी मोर्चे आणि धरणे यांची मालिका सुरू केली. अशाच एका मोर्चाला पांगवताना ४ मे १८८६ रोजी शिकागो मध्ये सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. याची परिणती पोलिसांच्या क्रूरतेविरोधातील एका मोठ्या निषेधात झाली त्यात एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉंब टाकला ज्यात ८ पोलिसांचा मृत्यू आणि ५० पोलीस जखमी झाले.
या घटनेच्या स्मरणार्थ १ मे १८९० रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रेमंड लेविन याने ‘दुसऱ्या आंतरराष्ट्रीय’च्या १९८९ च्या पॅॅरीस परिषदेत केली. त्या परिषदेत १ मे १८९० हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. १८९१ च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिक रित्या प्रतीवार्षिक कार्यक्रम म्हणून मान्यता देण्यात आली.