Karjat: सेनेतर्फे जोडेमारो आंदोलन

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याकडून खा. संजय राऊत यांच्यावर खोटे आरोप होत असून, राजकीय हेतूने प्रेरित होत इडीने कारवाई केली आहे. याचा नषेध म्हणून कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने
सोमय्यांची प्रतिकात्मक पुतळास जोडे मारून पुतळा दहन करण्यात आले.
यावेळी “हा बुलंद आवाज कुणाचा, जय भवानी, जय शिवाजी, राऊत साहेब आगे बडो अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणला होता. यावेळी शिवसैनिकांची गर्दी झाली होती.
सोमय्यांवर भ्रष्ट्राचाराचा आरोप
आयएनएस विक्रांत ही युध्दनौका देशसेवेतून निवृत्त झाली असून, ती भंगारात काढण्याऐवजी तिचे स्मारक बनवावे, यासाठी किरिट सोमय्यांनी ५८ कोटींचा निधी जनतेकडून गोळा केला. जमा झालेला हा निधी राज्यपालाकडे दिलाच नसल्याचे समोर आले आहे. सोमय्यांनी हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेना खा. संजय राऊत यांनी केला. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले.
देशद्रोहचा गुन्हा दाखल करा
दुपारी कर्जत मध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात
सोमय्या यांची प्रतिकात्मक पुतळा ल्या जोडे मारून
जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख बळीराम यादव, महावीर बोरा, अमृत लिंगडे, सुभाष जाधव, डॉ नितीन तोरडमल, बाळू निंभोरे, पांडुरंग जठार, अनिल यादव, श्रीमती दोशी आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करून आपला भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न किरीट सोमय्याचा आहे. तो शिवसेना कधीही सफल होऊ देणार नाही. त्यांची फक्त झलक आज दाखविली आहे. त्यांचा भ्रष्टाचार उघड केल्याशिवाय शिवसेना मागे हटणार नाही.
बळीराम यादव
कर्जत तालुका शिवसेना प्रमुख
विक्रांतच्या नावाखाली निधी जमवून गैरव्यवहार
हा बलिदानाचा लिलाव असून हा गैरव्यवहार करणाऱ्या वर
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करायला हवी.
अमृत लिंगडे
शिवसेना नेते