कर्जत: २१ फूट उंच शंभू महादेवाच्या कावडी ची जल्लोषात मिरवणूक
दोन वर्षांनंतर पुन्हा कर्जत मध्ये जल्लोष,२१ फूट उंच शंभू महादेवाच्या कावडी ची मिरवणूक
कर्जत दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर गुढीपाडव्याला स्थापना करण्यात येणाऱ्या ३०० वर्षांची परंपरा असलेल्या श्री शंभू महादेवाच्या कावडीची सालाबादाप्रमाणे कर्जत शहरातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. शंभू महादेवाच्या नावाने हर हर बोला’, ‘हर हर महादेव’, भगवान शंकर महादेव की जय’ असा जयघोष करीत कर्जत शहरातील नागेश्वर मंदिर, हनुमान मंदिर, श्रीराम मंदिर, गणपती मंदिर, गोदडमहाराज मंदिर, भैरवनाथ मंदिर, आक्काबाई मंदिर या व पारंपरिक मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली, यावेळी अनेक भाविकांनी, महिलांनी आरती पूजा करून शंभू महादेवाच्या कावडीचे दर्शन घेतले.
ढोरगल्ली येथून शंभू महादेवाच्या कावडीची मिरवणूक पारंपारिक वाद्यांच्या समूहात काढण्यात आली. हनुमान गल्ली, मुख्य रस्ता, गोदडमहाराज गल्ली, बाजार तळ, गणेश पेठ इत्यादी ठिकाणी ही कावड
नेण्यात आली. तेथे विधिवत पूजेने स्वागत करण्यात आले
कर्जत येथे दोन वर्षांनंतर शंभू महादेवाची कावड खांद्यावर घेऊन वाद्याच्या तालात नाचविण्यात आली भक्ती, शक्ती आणि कौशल्याची कसोटी
शिंदे परिवार या घरांशी निगडित असलेल्या या आगळ्या वेगळ्या शंभू महादेवाच्या कावडीची वाजत गाजत मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. जेथे व्यवस्थित जागा आहे अशा ठिकाणी ही २१ फूट उंच असलेली कावड अनेकजण खांद्यावर घेऊन वाद्यांच्या तालावर नाचवणे ही शिव भक्तांसाठी मोठ्या कौशल्याची, भक्तीची व शक्तीची परीक्षा असते असे संतोष शिंदे व गणेश शिंदे यांनी सांगितले.
दरवर्षी कावड शिखर शिंगणापूर येथे नेली जाते. भाविक भक्त खीर आंबिल घुगऱ्यांचा नैवेद्य महादेवास दाखवतात
दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर जल्लोषात निघालेल्या मिरवणुकीत संतोष शिंदे ,अविनाश शिंदे, गणेश शिंदे ,राजेंद्र येवले, अक्षय भारती, दादा थोरात, मिलिंद सुतार, बापूसाहेब मुळे, विकास मुळे, बुवासाहेब परहर, मेघराज राऊत, पप्पू सुतार, दत्ता कुंभार, आकाश कटके, सोमनाथ शिंदे, ओंकार शिंदे, शंकरराव शिंदे, मंगेश शिंदे, प्रकाश शिंदे, दीपक शिंदे, अनिल शिंदे, सुनील शिंदेी
यांच्या सोबत अनेकांनी काठी उचलून वाद्याच्या तालावर नाचवण्याचा प्रयत्न केला तर भाविक या कावड मिरवणूकीत तल्लीन झाले होते.