ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Karjat: उसाची तोड होत नसल्याने शेतकऱ्यावर ऊस जाळण्याची वेळ

काही नेत्याच्या समर्थक असणाऱ्या शेतकऱ्यांचा ऊस तोड करीत कारखान्यावर नेत असल्याचा माजीमंत्री राम शिंदे यांचा आरोप

कर्जत (Karjat)तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिल्लक उसासंबंधी प्रशासनाने केलेल्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. आपण ९ मार्च रोजी कर्जत येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर रास्तारोको आंदोलन केले होते त्यावेळी प्रशासनाने ऊस तोडणी न झालेल्या शेतकऱ्यांचा एक ही टिपरू शिल्लक ठेवणार नाही असे आश्वासीत केले होते. मात्र त्या आश्वासनाची पूर्तता आजमितीस देखील झाली नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

तालुक्यातील साखर कारखान्याने बाहेरील कार्य क्षेत्रातील उसाचे गाळप अगोदर केल्याने तालुक्यातील हक्काच्या शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहिला आहे. यासह तालुक्यातील उसाची तोड होत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यावर ऊस जाळण्याची नामुष्की ओढवली आहे.

काही नेत्याच्या समर्थक असणाऱ्या शेतकऱ्यांचा ऊस तोड करीत कारखान्यावर नेत असल्याचा आरोप माजीमंत्री राम शिंदे यांनी यावेळी तहसीलदारांना निवेदन देताना केला. शेतकऱ्याचे जाणते राजे, अनेक कारखाने चालविणारे आदरणीय शरद पवारांनी “ऊस हे आळशी शेतकऱ्यांचे पीक आहे.” असे म्हणणे अपेक्षित नाही असे म्हणत जर कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहिल्यास त्यास प्रत्येक हेक्टरी एक लाख रुपये प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी या आशयाचे निवेदन माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत भाजपाच्यावतीने तहसीलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले.

1 Comment
  1. […] Karjat: उसाची तोड होत नसल्याने शेतकऱ्यावर … […]

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !