ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Maharashtra Day 2022: महाराष्ट्र्र दिना निमित्त विशेष लेख – वैभवी दळवी

Maharashtra Day 2022
Maharashtra Day 2022

Maharashtra Day 2022: १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तेव्हापासून हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपण स्वतंत्र मराठी भाषिकांचे हे महाराष्ट्र राज्य कसे अस्तित्वात आले जाणून घेऊयात .

१ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची  निर्मिती झाले ली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.

या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५ मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली .

आपल्या हा महाराष्ट्र जिजाऊ , शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, आंबेडकर, लोकमान्य टिळक अशा विचारवंतांनी  संपन्न झाला आहे. महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. या महाराष्ट्राच्या मातीतून अनेक कवी, कलाकार, संगीतकार,

खेळाडूंनी जन्म घेऊन महाराष्ट्राचे नाव आपल्या कार्याने महान के आहे. (उंचावले आहे) ओव्या, अभंग, भारूड, पोवाडा व लावणी जणू महाराष्ट्र नावाच्या कुटुंबातीय सदस्य आहेत.

विकेटचा देव सचिन, बना मंगेशकर, सिंधूताई, बाबा आमटे यासारख्या अनेकांनी महाराष्ट्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. नमेच बहिणाबाई चौधरी, विवा शिरवाडकर, पु. ल. देशपांडे यांचे नाव आवर्जून घेतले जाते.

महाराष्ट्राला 720 किमी चा समुद्र किनारा लाभला आहे. येथील ऐतिहासिक गड किल्ले, लेण्या, लोणार सरोवर हे सर्व ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

अशा वैविध्यपूर्ण संस्कृतींनी व साहित्यांनी बहरलेल्या महाराष्ट्राचे जतन केले पाहिजे. वारसाचे जतन करून तिच्या अस्मितेची शिदोरी पुढील पिढीला सूफूर्त केली पाहिजे.

वैभवी दळवी

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi
अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi