ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Mahavir Jayanti 2022 : वर्धमान महावीर , यांच्या विषयी माहित नसणाऱ्या काही खास गोष्टी

Mahavir Jayanti 2022: यावर्षी १४  एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस भगवान महावीरांचा जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो. भगवान महावीर हे वीर , अतिवीर , सन्मति आणि वर्धमान म्हणूनही ओळखले जातात . आज महावीर जयंती (Mahavir Jayanti ) निमित्त आपण आपण त्याच्याविषयी काही खास माहिती जाणून घेणार आहोत .

 

वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी सर्व ऐहिक संपत्ती , संसार व राजपाट याचा त्याग केला. आध्यात्मिक जागृतीचा प्रसार व आत्मकल्याण करण्यासाठी जैन धर्माची दिक्षा त्यानी घेतली आणि साधू बनले . महावीरांनी 12 वर्षांपर्यंत महान तप आणि आत्मध्यान केले होते . 30 वर्षे भारतभर त्यांनी जैन तत्वज्ञानाचा धर्माचा  प्रचार प्रसार  केला . आणि 6 वे शतक इ.स.पू. मध्ये मोक्ष प्राप्ती – महावीरांचे 72 वर्षांच्या वयात निर्वाण झाले . ज्ञान प्राप्त केल्यानंतर महावीरांनी असे शिकवले की अहिंसासत्य , अस्तेय ( चोरी न करणे), अपरिग्रह व ब्रह्मचर्य ही पंचमहाव्रते आध्यात्मिक मुक्तीसाठी आवश्यक आहेत याची शिकवण संपूर्ण जगाला दिली.

 

भगवान महावीर ध्यानधारणेच्या अवस्थेत व सिंहांकित चिन्हासह अशा त्यांच्या मूर्ती भारतातील जैन तीर्थक्षेत्री आढळून येतात . चैत्र शुद्ध त्रयोदशी हा त्यांचा जन्मदिवस महावीर जयंती म्हणून साजरा केला जातो, आणि त्यांचे निर्वाणपर्व जैन अनुयायी दीपावली म्हणून साजरे करतात. दिप + आवली म्हणजे दिव्यांची ( ज्ञानरूपी दिवा ) आवली ( माळ) अर्थात त्यांच्या उपदेशाने दिव्य अशा मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक अशा ज्ञानाची परंपरा निर्माण झाली. तेव्हापासून ज्ञानांचे अखंड दिप तेवत राहोत अशा प्रभावनेने दिपावली साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. .

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi
अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi