स्थलांतरित प्राण्यांची नावे व माहिती (Names and Information of Migratory Animals)
स्थलांतरित प्राण्यांची नावे व माहिती (Names and Information of Migratory Animals)
एका प्रदेशातून दुसऱ्या दूरच्या प्रदेशांत जाण्या-येण्याच्या प्रवासाला स्थलांतर असे म्हणतात. ज्या वेळी प्राणी एकदा स्थलांतर केल्यावर परत त्या जागी येत नाहीत त्या वेळी त्या स्थलांतराला देशत्याग म्हणता येईल. काही प्राण्यांमध्ये परतीचे स्थलांतर तेच प्राणी करू शकत नाहीत, तर त्यांचे वंशज करतात. अशा स्थलांतराला देशागमन असे म्हणता येईल.
काही खेकडे अंडी घालण्याकरिता पाण्यात स्थलांतर करतात व अंडी घातल्यानंतर पूर्वीच्या ठिकाणी परत येतात. हे स्थलांतर सु. १२० किमी. असू शकते व त्याला सहा महिन्यांचा अवधी लागतो.
काही जातींच्या माशांचे स्थलांतर प्रसिद्ध आहे व त्याबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे. ⇨ईल या माशाच्या पुष्कळ जाती आहेत. त्या समुद्रात (खाऱ्या पाण्यात) जन्मतात व प्रौढावस्थेत आल्यावर सर्व आयुष्य नद्या व तळी (गोड्या पाण्यात) अशा ठिकाणी घालवितात. अंडी घालण्याच्या वेळी हे मासे परत आपल्या जन्म ठिकाणी दूरवर समुद्रात जातात व अंडी घालून ती फलित झाल्यावर तेथेच मरतात.
उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गात जपानी सॅलॅमँडर (मेगॅलोबॅट्रॅकसजॅपोनिकस) या प्राण्यात स्थलांतर आढळते. उन्हाळ्यात हे प्राणी नदीच्या उगमाकडे उथळ पाण्यात समुद्रसपाटीपासून ७०० मी. उंचीवर जातात. तेथे नर खड्डे करून मादीची वाट पाहत बसतो.
गालॅपागस बेटांवरील कासवांत (टेस्ट्यूडोएलेफंटोपस) स्थलांतर आढळते. ही कासवे पर्वताच्या पायथ्याशी पावसाळ्यात प्रजोत्पादन करतात आणि पुढे पाऊस संपल्यावर ७०० मी. उंचीवर स्थलांतर करतात. पाऊस सुरू झाल्यावर परततात. काही सागरी सापांमध्येही स्थलांतर आढळते.
स्थलांतरित पक्षी माहिती मराठी । Migratory Bird Information Marathi