ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Nanda Devi : नंदादेवी शिखर , नंदादेवी हेच जगातील सर्वोच्च शिखर

Nanda Devi
Nanda Devi

Nanda Devi : नंदादेवी हे भारताचे उंचीनुसार दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर आहे व संपूर्णपणे भारतात असलेले सर्वोच्च शिखर नंदादेवी हे आहे. याची उंची ७,८१६ मीटर (२५,६४३ फीट)  इतकी असून हे नंदादेवी शिखर  भारताच्या उत्तराखंड या राज्यात आहे.

उंची मापनाची तंत्रे अस्तित्वात येई पर्यंत नंदादेवी हेच जगातील सर्वोच्च शिखर असल्याची मान्यता होती. हे शिखर उत्तराखंड हिमालयाची आधार-देवता असल्याची श्रद्धा स्थानिक लोकांमध्ये आहे.या परिघात सन 1934 मध्ये प्रथमच प्रवेश झाला. ब्रिटिश-अमेरिकन गिर्यारोहक संघाने 1936 मध्ये प्रथम ते जिंकले होते. या पर्वतावर भगवान शंकराची पत्नी नंदा राहतात अशी हिंदूंची श्रद्धा आहे. मायलम व पिंडारी हिमनद्यांना हिमपुरवठा नंदादेवी हिमक्षेत्रातूनच होतो. पिढ्यान्‌पिढ्या भाविक हिंदू यात्रेकरू जवळपासच्या भागात येऊन जात असले तरी १९३४ पर्यंत नंदादेवीच्या भीषण, रम्य परिसरात कोणीही पाय ठेविला नव्हता. त्यावर्षी एरिक शिप्टन व टिलमन यांनी तिघा शेरपांसह ऋषिगंगेच्या निदरीतून मोठ्या कष्टाने व धाडसाने वाट काढून आतल्या पर्वतवलयाच्या आत प्रवेश केला.

नंदा देवी राष्ट्रीय उद्यान (nanda devi biosphere reserve)

नंदा देवी बायोस्फीअर रिझर्व्ह, ज्याला UNESCO टॅग देण्यात आला आहे, ते उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यातील पश्चिम हिमालय पर्वतावर आहे. समुद्रसपाटीपासून 3,500 मीटरपेक्षा जास्त उंचीवर वसलेले, या जैवक्षेत्रात नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्कचा समावेश आहे. रिझर्व्हचे एकूण क्षेत्रफळ ५,१४८.५७ किमी (१,९८७.८७ चौरस मैल) आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi
अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi