Pune : पुणे शहर पोलिसांना महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पोलीस युनिटचा पुरस्कार
Pune :पुणे शहर पोलिसांना महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पोलीस युनिटचा पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. पुणे शहराला जगातील सर्वात सुरक्षित शहर बनवण्याचे आमचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत पण अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, छोट्या-मोठ्या सर्व समस्या सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या पाठिंब्याने आणि इनपुट्सने पुण्याला जगातील कोठेही सुरक्षित शहर बनवण्याचा प्रयत्न करू.अशी प्रतिक्रिया पुणे शहर पोलीस दलाकडून देण्यात आली आहे .
पुणे शहर पोलिसांना या अगोदर देखील विविध पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे . सध्या पुणे शहराचे अमिताभ गुप्ता आयपीएस, पोलीस आयुक्त हे आहेत .