Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !

Shivlila Tai Patil: शिवलीला पाटील (Shivlila Patil) , यांचे नाव आपण नक्कीच ऐकले असेल त्यांना कोण ओळखत नाही ,शिवलीला पाटील (shivlila patil maharaj) या महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा कीर्तनकार आहेत .
शिवलीला पाटील, यांची सोशल मीडियात मोठी क्रेझ आहे त्याचे लाखो चाहते आहे . शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाला देखील मोठी गर्दी असते आपण शिवलीला पाटील यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत .
शिवलीलाचे वडील बाळासाहेब पाटील हे आहेत ते देखील कीर्तनकार आहेत .शिवलीला पाटील यांचे संपूर्ण कुटुंब ही वारकरी संप्रदायात आहे आणि यामुळेच शिवलीला पाटील यांना देखील कीर्तनाची गोडी निर्माण झाली .वयाच्या पाचव्या वर्षापासून शिवलीला पाटील यांनी कीर्तन करण्यास सुरुवात केली. शिवलीला ताई पाटील मोबाईल नंबर डायरेक्ट नाही देऊ शकत आपण त्याना इंस्टग्राम वर संपर्क साधू शकतात – https://www.instagram.com/patil.shivlila/
शिवलीला पाटील यांनी महाराष्ट्रातील अनेक गावां खेड्यात कीर्तनाला सुरुवात केली. तिच्या कीर्तनाला चांगला प्रतिसाद ही मिळू लागला. लोक शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाला पसंती देऊ लागले शिवलीला हिने वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात आपल्या कीर्तन करण्याच्या कलेतून खूप लोकप्रिय झाली. तिने अगदी लहान वयातच एक हजाराहून अधिक कीर्तन केले आहेत.
सोशल मीडियावर या खूप प्रसिद्ध असून तुम्ही यांचे व्हिडिओ नक्की कुठे ना कुठे पाहिला जरूर असेल . व बऱ्याच दा लोकांनी यांचे status ही आपल्या facebook किंवा whatsapp वरही ठेवले असेल. महाराष्ट्रतील तरुण वर्ग यांना खूप follow करतो तसेच प्रौढ मंडळी मध्ये ही यांची खूप लोकप्रियता आहे .
शिवलीला पाटील यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.
कलियुगातले कीर्तनकार, असं म्हणत सोशल मीडियावर शिवलीला यांना ट्रोल केलं गेलं.
बिग बॉस या कार्यक्रमातून बाहेर पडलेल्या कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे.
“माझा तेथे जाण्याचा मार्ग चुकला असला तरी हेतू प्रामाणिक होता. यापुढे ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय असा निर्णय घेणार नाही.
“बिग बॉसमध्ये माझ्या जाण्याच्या निर्णयाने वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते अशा शब्दांमध्ये शिवलीला पाटील यांनी माफी मागितली आहे,” असं त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. BBC