Swami samarth prakat din 2022: स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले ? जाणून घ्या !

Swami samarth prakat din 2022 : स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते या बद्दल कोणालाच काही माहिती नाही . याबद्दल एक कथा देखील आहे . या कथेत महाराजांचा जन्म थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापुर पासून १२ कोस (जवळपास २४ कि. मी. अंतरावर) छेली खेडा नावच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी शेजारी झाला असे सांगितले आहे .
स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन कोणी सुरु केला ?
स्वामी प्रकटदिनाचा उत्सव स्वमिसुत महाराजांनी सुरु केला आहे. ज्यावेळी स्वमिसुत महाराज हा उत्सव अक्कलकोट मधे करत होते तेव्हा भुजंगा सारख्या भक्तांनी स्वामिना प्रश्न विचारला स्वमिसुत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उततर आसे होते”माझा बळ मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे.” नाना रेखी नावाचे अहमदनगर चे स्वामीभक्त होते ते स्वमिसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोट ला आले होते.
स्वामी समर्थ प्रकटदिन आपल्या सर्वांसाठी खुप मोठी महापर्वणी आजच्याच दिवशी हा ‘अक्कलकोटस्थ परब्रह्म’ आपल्या सर्वांच्या पुर्वपुण्याईने आपल्याला प्राप्त झाला होता. आज प्रकट दिन वा जयंती महोत्सव आहे. हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा, ध्येर्य, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा आहे. इ. स. ११४९ ते १८७८ हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो. इ.स. १८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला.तो दिवस चैत्र शुध्द द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे,रविवार दि. ०६/०४/१८५६ हा होता.