दहाची पाणी बॉटल वीसला; वीसचे कोल्ड्रिंक्स पन्नासला , दारू ची देखील ज्यादा दराने विक्री !
Ahmednagar : कर्जत यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यापासून उन्हाची तीव्रता कमालीची जाणवत आहे. त्यामुळे बाटलीबंद पाण्याला ( bottle water) मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. परिणामी हा व्यवसाय तेजीत आहे. असे असले तरी कुलिंग चार्जेसच्या नावाखाली पाण्याची बॉटल ( bottled water) आणि कोल्ड्रिंक्स साठी जादा पैसे आकारले जात आहेत. उन्हाळ्याच्या महिन्यात या पॅकबंद पाण्याच्या बाटली विक्रीतून कोट्यवधीची उलाढाल होत आहे. १० रुपयास मिळणारी पाण्याची बाटली २० रुपयास विक्री करून ग्राहकांची लूट करण्याचा सपाटा काही व्यावसायिकांनी सुरू केला आहे.
सामान्य नागरिक पाणी शुद्धतेच्या मानांकनाबाबत अनभिज्ञ असतात. नेमका त्याचाच गैरफायदा घेत पाणी विक्रेते ग्राहकांची लूट करीत आहेत. यातूनच पाणी विक्रीचा व्यवसाय आता ग्रामीण भागातही फो फावू लागला आहे. बॉटल, पाऊचवर तारीख दिसत नाही. पॅकबंद वस्तूंच्या वेष्टनावर निर्मिती आणि त्या वस्तूच्या उपयुक्ततेचा कालावधी नमूद करणे कायद्याने बंधनकारक आहे. संबंधित वस्तू कोणत्या तारखेला उत्पादित झाली, ती किती दिवस टिकणार आहे, अंतिम मुदत कधीची आहे. याबाबत त्या वस्तूच्या वेष्टनावर सर्व बाबी नमूद करणे संबंधित उत्पादक कंपनीला बंधनकारक आहे; मात्र अनेक कंपन्या पाण्याच्या बाटलीवर असा उल्लेख करीत नाहीत, असा उल्लेख असला तरी तो अस्पष्ट किंवा वाचता येणार नाही, अशा पद्धतीने नमूद केलेले असतो.
१० रुपयांची पाणी बाटली २० रुपयाला
कोल्ड्रिंक्स थंड विकणे ही तर जबाबदारी विशेषत: ‘कुलिंग चार्जेसच्या नावाखाली दूध, कोल्ड्रिक्स, आईस्क्रिम अशा पदार्थाच्या छापील किमतीहून अधिक दर आकारला जातो. दूध खराब होऊ नये, पाणी थंड रहावे म्हणून, किंवा आईस्क्रिम वितळू नये म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवणे अनिवार्यच असते. त्यामुळे अशा गोष्टींसाठी कुलिंग चार्जेस आकारणे योग्य नाही असे असतानाही एमआरपीपेक्षा जादा पैसे घेऊन ग्राहकांची लूट केली जात आहे.
तक्रार कशी दाखल करायची..
ब्रँडेड कंपन्यांची बाटली डिस्ट्रिब्युटरकडे १० ते १२ रुपयांना मिळते; पण बाजारात हीच बाटली २० रुपयांना विकली जाते. स्थानिक व परजिल्ह्यातील कंपन्यांच्या बाटलीची किंमत १०, १५, २० रुपये असते. प्रत्येक बाटलीमागे पाच ते आठ रुपये जादा घेतले जात आहेत.
एखाद्या व्यापाऱ्यांकडून आर्थिक लूट झाली असेल तर ग्राहकांना याबाबत तक्रार नोंदवायची असल्यास त्यासाठीची प्रक्रिया सोपी आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, राज्य तक्रार निवारण आयोग आणि राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे लेखी तक्रार प्रत्यक्ष किंवा टपालानं करता येते. ऑनलाईन पद्धतीने तक्रार
करायची असल्यास https://edaakhil.nic.in/edaak hil/ या वेबसाईटवर देखील तक्रार करता येते.
ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत नुकसानभरपाई किती आहे, त्यावरून तक्रार कुठे करायची हे ठरवलं जाते. १० लाखापर्यंत असल्यास संबंधित जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांच्याकडे तक्रार करता येते. ग्राहकानं तो घेत असलेल्या सेवा आणि वस्तूमध्ये दोष, उणिवा आढळल्यास दोन वर्षांच्या कालावधीमध्ये तक्रार करता येते.
– अॅड. ज्ञानदेव काकडे
कर्जत तालुक्यात देशी विदेशी दारू विक्री परवाना ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात जादा दराने विक्री करण्यात येते याकडे पोलीस व उत्पादन शुल्क विभाग लक्ष देताना दिसत नाही. तर विनापरवाना दारू विक्री दुकानातून तर भरमसाठ जादा पैसे घेऊन ग्राहकांची सर्रास लूट केली जात आहे. या प्रकाराकडे लक्ष देवून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी प्रशासकीय अधिकारी यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
World Liver Day 2022: का साजरा करतात , जागतिक यकृत दिन , यकृत निरोगी ठेवण्यासाठी काय करावे ?
Happy Birthday Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांच्याबद्दल माहित नसणाऱ्या काही खास गोष्टी !