ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतील कर्जत शहर निर्माण करण्यासाठी,नगरपंचायत आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात

कर्जत मध्ये नगरपंचायत आपल्या दारी हा अभिनव उपक्रम - नामदेव राऊत 

Ahmednagar : कर्जत जामखेडचे कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार (Rohit Dada Pawar)यांच्या संकल्पनेतील कर्जत शहर निर्माण करण्यासाठी व नगरपंचायतीच्या सर्व प्रभागांमधील विकासकामे पूर्ण करण्यासाठी लोकांची मते जाणून घेणे गरजेचे आहे . यासाठी नगरपंचायत आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात प्रथम नगराध्यक्ष श्री . नामदेव ( देवा ) राऊत यांच्या प्रभाग क्र . १२ मधून झाली .

 

प्रभातनगर येथील दत्तमंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमासाठी प्रभाग क्र . १२ मधील आतारवाडा , शहाजीनगर , प्रभातनगर , वाघवस्ती , भैलुमेवस्ती , ढेंगळे बाबा नगर , पळसओढा या भागातील महिला व पुरुष खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाच्या सुरवातीला नगराध्यक्षा उषा राऊत , उपनगराध्यक्षा रोहिणी घुले , मुख्याधिकारी गोविंद जाधव , सर्व समित्यांचे सभापती , नगरसेवक यांच्या हस्ते दत्तमूर्ती व ग्रामदैवत सदगुरु गोदड महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . प्रभाग क्र . १२ चे नगरसेवक नामदेवराव राऊत यांनी प्रास्ताविक केले . यावेळी बोलताना ते म्हणाले की , आमदार रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून प्रभाग क्र . १२ हा कर्जत शहरासाठी विकासाचे मॉडेल म्हणून तयार करणार आहे . यासाठी ” माझे कुटुंब , माझे झाड ” , महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटामार्फत लघुउद्योग सुरु करणे , सौर उर्जाचा वापर वाढवण्यासाठी घर तेथे सौर पॅनल बसविणे ,वरील सर्व मागण्या नागरीकांनी केल्या असता प्रभाग क्र . १२ चे नगरसेवक नामदेवराव राऊत यांनी आपली सर्व कामे आमदार रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून पूर्ण केले जातील असे आश्वासित केले .

 

नगरपंचायत स्तरावरील सर्व तक्रारी नगरपंचायत अधिकारी यांच्याकडून तात्काळ सोडविल्या जातील असे सांगितले . यावेळी मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी ब्लॅक वॉटर व ग्रे वॉटर यांचे स्वतंत्र संकलन करून त्यावर प्रक्रिया करून ते पाणी झाडांना सोडण्याचा पायलट प्रोजेक्ट प्रभातनगर येथे राबविणार असल्याचे सांगितले . नागरिकांनी विकासकामांसाठी नगरपंचायतला सहकार्य करावे असे आवाहन केले . नगराध्यक्षा उषा राऊत यांनी नगरपंचायत आपल्या दारी या उपक्रमाचे कौतुक करून नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविणार असल्याचे सांगितले . आमदार रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून कर्जतचा चेहरा बदलणार असून कर्जत हे विकासाचे रोल मॉडेल करणार असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या .

 

नगरपंचायत आपल्या दारी या उपक्रमामुळे प्रभागातील विकासकामांना गती मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले . याप्रसंगी उपनगराध्यक्षा रोहिणी घुले , पाणी पुरवठा सभापती भास्कर भैलुमे , नगरसेविका प्रतिभाताई भैलुमे यांनी मनोगत व्यक्त केले . यावेळी गटनेते संतोषराव मेहेत्रे . महिला बालकल्याण समितीच्या सभापती ज्योती शेळके , उपसभापती लंकाबाई खरात , बांधकाम समिती सभापती छाया शेलार , नगरसेविका प्रतिभाताई भैलुमे , नगरसेविका ताराबाई कुलथे , नगरसेविका सुवर्णा सुपेकर , नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल , नगरसेवक अमृत काळदाते , नगरसेवक अभय बोरा , नगरपंचायतच्या सर्व विभागाचे विभागप्रमुख अधिकारी , नगरपंचायतचे कर्मचारी तसेच प्रभागातील नागरिक व महिला खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते . नगरसेवक नामदेवराव राऊत यांनी प्रभागामध्ये नगरपंचायत आपल्या दारी हा उपक्रम सर्वप्रथम प्रभाग क्र . १२ मध्ये राबविल्याबद्दल व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्याबद्दल उपस्थितांनी आमदार रोहित दादा पवार व नामदेवराव राऊत यांचे विशेष आभार मानले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . चंद्रकांत राऊत सर यांनी केले व प्रा . रविंद्र जगदाळे यांनी आभार मानले

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi
अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi