व्यापार खाते (Trading Account) म्हणजे काय ?
Trading Account: व्यापार खाते हे एक नामधारी खाते आहे. एका आर्थिक वर्षात व्यवसायाला ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा किती झाला हे शोधून काढण्याकरीता व्यापार खाते व्यापारी संस्था तयार करतात. व्यापार खात्याच्या नावे बाजूवर सर्वप्रत्यक्ष खर्च तर जमा बाजूवर सर्वप्रत्यक्ष उत्पन्न नोंदविले जाते. जर व्यापार खात्याच्या जमा बाजूची बेरीज नावे बाजूच्या बेरजेपेक्षा ज्यास्त असेल तर ढोबळ नफा दर्शविते आणि जर नावे बाजूची बेरीज जमा बाजूच्या बेरजेपेक्षा ज्यास्त असेल तर ढोबळ तोटा दर्शविते. हा ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा नफा तोटा खात्याला स्थानांतरित केला जातो.
“व्यापार खाते हे खरेदी आणि विक्री व्यवहारांचे परिणाम दर्शविते. हे खाते तयार करतांना सामान्य आस्थापन खर्चाचा विचार
करण्यात येत नाही यामधे केवळ वस्तूशी संबंधित (Related to goods) व्यवहारांचाच समावेश होतो.”
नफा तोटा खाते (Profit and Loss Account)
नफा ताेटा खाते हे नामधारी खाते आहे. नफा ताेटा खाते हे महत्त्वाचे खाते असून व्यवसायातील चालू आर्थिक वर्षातील शुद्ध
नफा किंवा शुद्ध तोटा जाणून घेण्यासाठी तयार करण्यात येते. चालू वर्षाशी संबंधित सर्व अप्रत्यक्ष खर्च ज्यांचे शोधन करण्यात आले
आहे किंवा करावयाचे आहे ते सर्व नफातोटा खात्याच्या नावे बाजूवर दर्शविले जातात. तसेच चालू वर्षाशी संबंधित अप्रत्यक्ष उत्पन्न जे
मिळाले आहे किंवा मिळावयाचे आहे ते सर्व नफातोटा खात्याच्या जमा बाजूवर दर्शविले जातात. नफा तोटा खात्याची जमा शिल्लक
शुद्ध नफा दर्शविते. हा शुद्ध नफा भागीदारांच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूवर दर्शविला जातो किंवा भांडवलात आधिक(+)
केला जातो. नफातोटा खात्याची नावे शिल्लक शुद्ध तोटा दर्शविते. हा शुद्ध तोटा भागीदारांच्या भांडवल खात्याच्या नावे बाजूवर
दर्शविला जातो किंवा भांडवलातून वजा (-) केला जातो.