Vasant More MNS : कट्टर मनसैनिक, वसंत मोरे ,यांच्याबद्दल काही खास गोष्टी ,जाणून घ्या !
Vasant More MNS : कट्टर मनसैनिक वसंत मोरे सध्या चर्चेत आहेत यांच्याबद्दल काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत .
Vasant More MNS: वसंत कृष्ण मोरे, म्हणजे राज ठाकरेंचे विश्वासू मनसैनिक आहेत . वसंत मोरे सध्या चर्चेत आहेत, ते राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेमुळे. त्या सभेत राज यांनी मुस्लिम समाजाच्या मशिदींवरील भोंग्यांना टार्गेट केलं आणि भोंग्यांविरुद्ध हनुमान चालीसा असं युद्धच सुरू झालं.
वसंत मोरे यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1975 साली पुण्यात झाला. कात्रजच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातून शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी शाहू मंदिरमध्ये महाविद्यालयीनं शिक्षण पूर्ण केलं. वसंत मोरेंच्या व्यावसायाबाबत बोलायचं झालं तर ते एक व्यावसायिक असून शेतकरीही आहेत. (ABP NEWs )