ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Why petrol-diesel so expensive : पेट्रोल-डिझेलच्या एवढं महाग का?

                                                                        प्रथमदर्शनी बघितलं तर भारतातल्या वाढत्या किंमतींचा थेट संबंध जगभरातल्या खनिज तेलाच्या दरवाढीशी आहे. पेट्रोल, डिझेल ही प्रक्रिया केल्यानंतरची इंधनं आहेत. मूळ पदार्थ आहे खनिज तेलआणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या खनिज तेलाच्या किंमती 73 अमेरिकन डॉलर प्रती बॅरल इतक्या आहेत. एका बॅरलमध्ये साधारण 162 लीटर खनिज तेल असतं. 

                               आयात केलेल्या खनिज तेलावर प्रक्रिया करून, त्यात केंद्र आणि राज्य सरकारचे दुहेरी कर जमा करता, भारतात मागच्या महिन्यात हा दर लीटरमागे 85 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता.अर्थतज्ज्ञ डॉ. अभिजीत फडणीस यांनी खनिज तेलाच्या किमतींबरोबरच आणखी काही मुद्द्यांकडे लक्ष वेधलं. त्यांच्या मते या दरवाढीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशांमध्ये ताणलेले संबंधही कारणीभूत आहेत.

                       तेल उत्पादक देशांची संघटना अर्थात OPECने संयुक्तपणे निर्णय घेत खनिज तेलाचं उत्पादन कमी केलं आहे. शिवाय सौदी अरेबियाला पुढच्या वर्षी सौदी अरामको या सरकारी तेल कंपनीचे शेअर बाजारात आणायचे आहेत. अशा वेळी तेलाच्या किंमती चढ्या असतील तर कंपनीच्या शेअरना किंमत मिळेल. या न्यायाने त्यांनीही तेलाच्या किमती वरच ठेवण्याची खबरदारी घेतली आहे,”

                           फडणीस यांनी खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमागचं गणित समजावून सांगितलं.आगामी काही कालावधीसाठी ही परिस्थिती अशीच कायम राहील, असंही त्यांनी बोलून दाखवलं.

पण त्याच वेळी, 2019 मध्ये परिस्थिती हळूहळू निवळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi
अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi