ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

औरंगजेब कबर कुठे आहे ? मृत्यू अहमदनगर मध्ये कुठे झाला ? लोक औरंगजेब कबर ला भेट का देतात ?

बादशाह औरंगझेबचा मृत्यू ३मार्च, १७०७ साली अहमदनगर येथे झाला. मुलगा आझम शाह आणि मुलगी झीनत-ऊन-निस्सा ह्यांनी त्यांचा दफन विधी खुलदाबाद (औरंगाबादपासून २०-२२किमी लांब) येथे केला.

खुलदाबाद हे समाधींचे गाव म्हणून ओळखले जाते. येथे जवळपास १५०० समाधी आहेत. आपला दफन विधी खुलदाबाद मधील शेख झैन-उद्-दिन (औरंगझेबचा अध्यात्मिक गुरू) यांच्या दर्गा जवळ करावा, अशी औरंगझेबची मृत्यूपूर्व इच्छा होती. झैन-उद्-दिन दर्गा मध्ये दक्षिण-पूर्व कोपऱ्यात ही समाधी आहे. ह्या समाधीचे वैशिष्ठ तिच्या साधेपणात आहे. औरंगझेबने हिंदुस्थानच्या बहुतांश भागावर ५०वर्ष राज्य केले, तरीही त्याची मृत्यूपूर्व इच्छा अशी होती की त्याचे अंतिम संस्कार गाजावाजा न होता करावे. समाधी सुद्धा एकदम सध्या पद्धतीने बांधावी जी त्याच्या स्वकमाई च्या पैशातून असेल.

लोकं ही कबर बघायला का जातात?

निर्दयी, धर्मवेडा, धर्मांध, कठोर शासनकर्ता असून देखील कित्येक लोकं रोज औरंगझेबाच्या कबरचे ‘दर्शन’ घेण्यास जातात. होय, औरंगझेबला मानणारा मोठा वर्ग भारतात अस्तित्वात आहे. कारण औरंगझेबला तो हयात असतानाच “जिंदा पीर” बोलले जात असे. औरंगझेब इस्लाम धर्माचा अत्यंत कडवट आणि आक्रमकपणे पालन करायचा. त्याचे राहणीमान अगदी साधेपणाचे होते. एखाद्या वैराग्यासारखे शनोशौकत, डामडौलचा त्याला तिटकारा असे. इस्लाममध्ये निषिद्ध मानलेल्या गोष्टींवर त्याने बंदी आणली. शरियत कायद्याचा अंमल बसवण्याचा प्रयत्न केला. काही लोक इतिहासाच्या अभावामुळे औरंगझेबला खरोखर संत समजतात, जे दुर्दैवी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील ! आजचा सुविचार good morning image आयुष्यात कधीच कोणावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू नका happy holi message in marathi