ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

महागाई

महागाई
महागाई

महागाई हा शब्द कोरोना इतकाच भयानक आहे ना ? दिवसा मागून दिवस जातायेत पण हि महागाई कमी व्हायना ती वाढत च चालली आहे.

गेल्या दोन वर्षात संपूर्ण जगावर कोरोना ने थैमान घातलं, त्यामुळे जवळ जवळ सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती डगमगली. लॉकडाउन मुळे खूप लोक कर्जबाजारी झाले. आता सगळं पूर्ववत चालू झालं. परंतु दोन वर्षांच नुकसान भरून काढण्यासाठी सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत.

पेट्रोल चे भाव तर आभाळाला टेकले आहेत. पेट्रोल परवडत नाही म्हणून काही लोकं सार्वजनिक वाहनांचा वापर करतील. पण फक्त पेट्रोल च नाही तर पेट्रोल सोबतच अन्नधान्य व तेल यांच्या किंमतीत सुद्धा वाढ झाली आहे. शैक्षणिक साहित्याचे दर देखील दुप्पटीने वाढत आहे. मुलांना शिकवायचं कस शाळेची फी कशी भरायची असा मोठा प्रश्न पालकांसमोर पडला आहे.

आज च्या जगात गरिबाने इंग्लिश मिडियम मध्ये शिकायचे फक्त स्वप्न बघावं. गरीब माणूस पाण्यात सुद्धा भाजी शिजवून खाऊ नाही शकणार कारण भाज्या पण महागल्या आहेत. अशी अवस्था आहे आजची.

सरकार जनतेसाठी खूप सुविधा पुरवत आहे परंतु काळा बाजार थांबवू शकत नाहीये. त्यात जनतेचा हि दोष आहेच म्हणा, काही सरकारी लोकं मधल्या मध्ये पैसे खातात. तर काही ठिकाणी जनता. प्रत्येक माणूस आपला स्वार्थ बघतो आहे दुसऱ्याच्या खिशाची त्याला काळजी च राहिलेली नाही. तो फक्त पैशाच्या मागे धावतो आहे.

अशा वेळी पोटाला चिमटा बसणारा देवाला विचारतोय —

कसा करू उदर, निर्वाह तुच सांग देवा

पोटभर अन्न मिळेल का मला केव्हा ?

देव म्हणाला प्रामाणिकपणे कष्ट कर पोटाला लागतं तेवढंच कमव जास्त हाव काही कामाची नाही.

गरीब माणूस देवाला म्हणाला कसं अन् किती करू कष्ट?

माझ्या चिमुरड्या लेकराला चतकोर भाकरी मिळना। महागाई चा भस्मासूर सुखानं जगू द्यायना ।।

तेवढ्यात तिथे महागाई आली त्यांच संभाषण ऐकून गरिबाला हिनवू लागली.

तू गरीब तू गरीब हाहा हाहा हाहा

दाखव माझ्याशी सामना करून ।।

हे ऐकून गरिबाचे आले रे डोळे भरून…….

खूपच वाईट आहे ही भूक जन्मास आली गरिबी त्यात माझी काय चूक त्यात माझी काय चूक……

तात्काळ परमेश्वर उत्तरला उठ बाळा उठ अशी हार मानू नकोस.

परिस्थिती वर मार्ग काढ

प्रामाणिक पणाच्या साथीने

काळा बाजारा च्या ताटात अंधार वाढ

एकीचे बळ एकवटून

लाव महागाई ला हाकलवून

लाव महागाई ला हाकलवून ।।

Leave A Reply

Your email address will not be published.

ITECH Marathi । Short poem on my india my pride Ashadhi Ekadashi 2022 अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !