ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

संत कान्होपात्रा यांची संपूर्ण माहिती – Sant Kanhopatra information in marathi.

संत कान्होपात्रा

मित्रांनो माझे आबा म्हणजे आत्या चा नवरा त्यांना आम्ही आबा म्हणतो तर आबांनी व माझ्या आजी ने लाडाने माझं नाव कान्होपात्रा पाडले. मला हे नाव आवडलं पण त्या नावाचा अर्थच कळेना, मला वाटलं ते मला चिडवत आहे म्हणून मी गूगल वर सर्च केलं तेव्हा मला कळलं आणि ते नाव आवडलं पण आणि त्या व्यक्ती चा अभिमान पण वाटला.

मला कविता करायला आवडते म्हणून माझं नाव कान्होपात्रा पाडलं का, मी दिसायला चांगली आहे असं त्यांना वाटत म्हणून कान्होपात्रा बोलतात ते नाही माहित. हो पण ही कान्होपात्रा नक्की आहे तरी कोण ? चला तर मग बघूया –

आपल्या भारत देशाला फार मोठी संत परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई , संत एकनाथ महाराज असे अनेक संत होऊन गेले. ह्या सर्वांसोबतच आपल्या महाराष्ट्रात संत कान्होपात्रा यांचे नाव हि आदराने घेतले जाते. महाराष्ट्र राज्यात वारकरी संप्रदायींचे भक्ती स्थान असणारे विठ्ठलाचे पंढरपूर. ह्या पंढरपूर पासून अवघे २२किमी. अंतरावर असणाऱ्या मंगळवेढा गावात इ.स 1390 मध्ये म्हणजेच १५ व्या शतकात एका गणिकेच्या पोटी कान्होपात्रा चा जन्म झाला.

कान्होपात्रा च्या आई चे नाव शामा होते. ही शामा आपल्या नाच-गाण्याने अनेक मुस्लिम सरदार, श्रीमंत लोकांना खुश करायची. त्यामुळे खूप लांबून लांबून लोकं शामा ला भेटायला यायचे.

अश्या ह्या शामा नर्तिके च्या पोटी सुंदर मुलीने जन्म घेतला. कान्होपात्रा म्हणजे जणू स्वर्ग लोकातील अप्सरा च!

कान्होपात्रा दिसायला सुंदर व गुणी होती. ती खूप छान लावणी करायची आणि तिचा गळा म्हणजे तिचा आवाज कानाला अत्यंत गोड वाटायचा. तिच्यात असणाऱ्या ह्या गुणांमुळे शामा ला वाटायचे कि आपल्या मुलीने सुद्धा हा व्यवसाय करून बड्या अमीर मंडळींना खुश ठेवावे.

परंतु कान्होपात्रा ही बालपणापासूनच विठ्ठलाची निस्सीम भक्त होती. ही तिची भक्ती पूर्वपुण्याई असावी. ती नेहमी वारकऱ्यांसोबत पंढरपूर ला जायची. त्यामुळे आई चा व्यवसाय पुढे चालवावा असा विचार तिच्या मनात कधी आलाच नाही.

या वारीत कान्होपात्रेला प्रत्यक्षात संत ज्ञानेश्वर माउलींचे दर्शन झाले त्यांचा सहवास लाभला. यामुळे ती खूप बदलली. ती वाईट विचारांपासून दूर राहिली. सतत विठ्ठलाचे नामस्मरण करणे किर्तन करणे ह्या गोष्टीत तिचे मन रमू लागले.

तिच्या सौंदर्यामुळे तरूण पणी तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. बिदरच्या बादशाह पर्यंत तिच्या सौंदर्या ची वार्ता पोहचली. बादशाहाने कान्होपात्रा ला पकडून आणायला आपले सरदार मंगळवेढ्याला पाठवले. तेव्हा स्वतःचे रक्षण करण्यासाठी कान्होपात्रा वेश बदलून वारीत शिरली व वारकऱ्यांसोबत पंढरपूर ला गेली. विठ्ठलाचे दर्शन घेत ती त्याला माझे रक्षण कर अशी विनंती करू लागली.

नको देवराया अंत आता पाहू। प्राण हा सर्वता जावू पाहे।।

हरिणीचे पाडस। व्याघ्रे धरियेले। मजलागी झाले तैसे देवा।।

मोकलून आस। जाहले उदास। घेई कान्होपात्रेस हृदयात।।”

बादशाहा च्या सरदारांनी तिला शोधून काढले. आणि कान्होपात्रा तू जर आमच्या सोबत नाही आली तर हे मंदिर उधवस्त करेल अशी धमकी दिली. कान्होपात्रा विठ्ठलाची भक्त ती आपल्या देवाचे मंदिर उधवस्त कशी होऊ देणार ? म्हणून तिने त्यांच्या सोबत जाण्याची तयारी दाखवली.

शेवटची इच्छा म्हणून परत एकदा विठ्ठलाच्या पायावर डोक ठेवायची विनवनी करू लागली. आणि विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवून तिने आपला प्राण सोडला. परंतू ती त्या सरदारांसोबत नाही गेली.

कान्होपात्रेला मंदिराच्या दक्षिण दरवाज्यात पुरून त्या ठिकाणी एक वृक्ष लावला तो वृक्ष अजूनही हिरावा असून कान्होपात्रे च्या भक्ति ची साक्ष देत उभा आहे.🌱अस म्हणतात.

तर अशी ही संत कान्होपात्रा आपल्या भारतात होऊन गेली. त्यांनी खूप सारे ओवी अभंग रचले आहेत. कान्होपात्रा यांचे अभंग ‘सकल संत गाथा’ या ग्रंथामध्ये आहेत.

मला कान्होपात्रा बद्दल जेवढी माहिती समजली तेवढी मी तुमच्या सोबत शेअर केली. आणि अजून माहिती मिळाली कि मी आपल्या साइट वर नक्की अपडेट करेल. हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर कंमेंट करून जरुर कळवा. 😊🙏

Leave A Reply

Your email address will not be published.

Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील ! आजचा सुविचार good morning image आयुष्यात कधीच कोणावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू नका happy holi message in marathi