1 june 2022 : एक जून वाढदिवस , का असतात या दिवशी सर्वात जास्त ‘वाढदिवस ‘ जाणून घ्या !

1 june 2022: एक जून (1st june). आज अनेकांच्या वडिलांचे नातेवाईकांचे वाढदिवस असतील अनेकांच्या व्हाट्सअप आणि सोशल मीडियावर शुभेच्छा चा वर्षाव होत असेल अनेकांचं (birthday) एकाच वेळी असण्याचा दिवस म्हणजे 1 जून. या दिवशी आपल्या आजूबाजूला अनेकांचा वाढदिवस असतोच. सोशल मीडियावर असणाऱ्या जवळपास प्रत्येकाच्या अकाउंटशी 1 जून रोजी वाढदिवस (birthday on 1st june) असणारे शेकडो फ्रेंडस जोडलेले असतात. अशावेळी सर्वांचे वाढदिवस एकत्र जल्लोषात साजरा केला जातो.
का असतात एक जून ला सर्वात जास्त वाढदिवस ?
पूर्वी जन्म मृत्यूची नोंद कोणी करत नसायचे आणि मग शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी कोणाकडे कसली कागदपत्रे नसायचे अशावेळी शाळेत मग नोंद करताना जन्म तारीख सांगता येत नसत मग अशावेळी बऱ्याच जणांची तारीख हि १ जुन टाकली जात असत !