ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Ahilyadevi Holkar Jayanti : अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !

अहिल्याबाई होळकर
अहिल्याबाई होळकर

Ahilyadevi Holkar Jayanti: मराठा साम्राज्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर (Ahilyadevi Holkar ) यांची आज जयंती. अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 मध्ये अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील चौंडी (karjat-jamkhed ) येथे झाला.

बाजीराव पेशव्यांचे  सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते ते पुण्याला जात असताना चोंडी या गावात थांबले होते यावेळी अहिल्याबाईंना मल्हारराव होळकर यांनी महादेवाच्या देवळात पाहिले यावेळी त्या केवळ ८ वर्षाच्या होत्या .त्यांना ती मुलगी आवडली त्यामुळे  त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ.स. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या.

राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

अखंड भारत देशाच्या इतिहासाला देखील अभिमान वाटावा आणि एक भारतीय म्हणून आपली छाती गर्वाने भरून यावी असा आदर्श राज्यकारभार ज्या अद्वितीय शक्तीने या देशात करून दाखवला. अशा अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन….

 

इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

 

आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती ! अहिल्याबाईंनी इंदूर संस्थानात अहिंसा, धर्म, नीती, न्याय प्रस्थापित केले. कुशल प्रशासक, चाणाक्ष नेतृत्व, राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! त्यांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याचा मी अविरत प्रयत्न करत राहीन.

 

राजमाता,रणरागिणी,कर्मयोगिनी,पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतिंना विनम्र अभिवादन.!

 

चलो सोलापूर! राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २९७ व्या जयंती निमित्त शनिवार दिनांक २८ मे २०२२ रोजी ओबीसी हक्क परिषद आयोजित करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !